सतीश पाटील, संजीव माने यांचा आज पोखर्णीत नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST2021-02-05T07:26:33+5:302021-02-05T07:26:33+5:30

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील व कृषिभूषण डॉ. संजीव माने ...

Satish Patil and Sanjeev Mane were felicitated at Pokharni today | सतीश पाटील, संजीव माने यांचा आज पोखर्णीत नागरी सत्कार

सतीश पाटील, संजीव माने यांचा आज पोखर्णीत नागरी सत्कार

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील व कृषिभूषण डॉ. संजीव माने यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल रविवार, दि. ३१ रोजी सकाळी १० वाजता नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विविध पिकांचे उच्चांकी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पोखर्णीच्या सरपंच रेखाताई पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाल्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुण लाड असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मानसिंगराव नाईक, कृष्णाकाठ उद्योगसमूहाचे संस्थापक जे.के. (बापू) जाधव, कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी आशिया विभागाचे डीन सुनील बेळगावे उपस्थित राहणार आहेत. सर्वोदय कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील, डॉ. पी.एम. पाटील, दिग्विजय पाटील, प्रतीक पाटील व सहकारी संयोजन करीत आहेत. डॉ. सतीश पाटील यांनी सन २००३-०४ मध्ये पोखर्णी येथे अशोका अ‍ॅग्रो फर्टच्या माध्यमातून सेंद्रिय खतनिर्मितीस प्रारंभ केला. सेंद्रिय खतांची निर्मिती, प्रसार तसेच शेती विकास या क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे. या माध्यमातून त्यांनी कृषी प्रशिक्षण आणि विकास त्याचप्रमाणे शेती उत्पादनवाढीसाठी हजारो शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचे महत्त्व पटवून देतानाच प्रदूषणमुक्त शेतीसाठी मोठे योगदान दिले आहे. कृषीभूषण डॉ. संजीव माने यांनी एकरी २०० टन ऊस उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. पोखर्णी येथे डॉ. सतीश पाटील व कृषीभूषण डॉ. संजीव माने यांच्यासह शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Satish Patil and Sanjeev Mane were felicitated at Pokharni today