शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाका-अनिलभाऊंचे गुफ्तगू...

By admin | Updated: May 21, 2015 00:02 IST

फोरमचे नेते एकत्र : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत आमने-सामने असणारे खासदार संजय पाटील आणि आ. अनिल बाबर यांच्यात बुधवारी दुपारी सांगलीच्या विश्रामगृहात अर्धा तास गुफ्तगू सुरू होते. जिल्हा बँक निवडीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे सूर आळवले. थकित कर्जामुळे जिल्हा बँकेने नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखाना लिलावात काढला होता. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाने तो लिलावात खरेदी केला होता. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने चुकीची लिलाव प्रक्रिया राबविली असून, कारखान्याचा लिलाव बेकायदेशीर असल्याने कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्यावतीने शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी याचिका दाखल केली आहे. यशवंत कारखान्याच्यानिमित्ताने बाबर आणि संजयकाका एकमेकांसमोर उभे आहेत. दोन्ही नेत्यांमधील कारखान्याची लढाई आता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्यानिमित्ताने बुधवारी एकत्र आले. निवडीची प्रक्रिया संपल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस भवनसमोरील विश्रामगृहात ते एकत्र आले. दुष्काळी फोरमचे नेते भाजपचे आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तेथे उपस्थित होते. संजयकाकांची पत्रकार परिषद सुरू असताना बाबर त्यांच्या बाजूलाच बसले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर दोन्ही नेते विश्रामगृहाच्या ‘अँटी चेंबर’मध्ये गेले. बंद खोलीत त्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी, ही ‘यशवंत’ची चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. विश्रामगृहात संजयकाकांचे काही समर्थकही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही या दोन्ही नेत्यांच्या अचानक एकत्रित येण्यामुळे व चर्चेमुळे आश्चर्य वाटले. (प्रतिनिधी)बँकेतही एकत्र हे दोन्ही नेते ‘यशवंत’च्या लढाईत आमने-सामने असले तरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून एकाच पॅनेलमधून निवडून आलेले आहेत. पदाधिकारी निवडीवेळीही ते एकत्रच होते.आम्ही एकत्रच !दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर दुष्काळी फोरमचे नेते पृथ्वीराज देशमुख आणि आ. विलासराव जगताप म्हणाले की, आम्ही बऱ्याचदा एकत्रित असतो. दुष्काळी फोरमच्या माध्यमातून एकत्र आलो असलो तरी, सध्या सरकारमध्येसुद्धा एकत्र आहोत. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी संवाद साधतो. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.