सांगलीत घरफोड्यांची मालिका सुरूच; : नागरिकांमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:13 PM2017-11-27T22:13:40+5:302017-11-27T22:38:09+5:30

सांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे.

 Sangli's house boom continues; : Citizens frighten | सांगलीत घरफोड्यांची मालिका सुरूच; : नागरिकांमध्ये घबराट

सांगलीत घरफोड्यांची मालिका सुरूच; : नागरिकांमध्ये घबराट

Next
ठळक मुद्देवाटमारीतून खुनाचीही घटना, पोलिसांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ पथके नावालाच उरली आहेत.नाकाबंदी, गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग आॅपरेशन या कारवाया बंद

सचिन लाड
सांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे. रात्रीच्यावेळी एकट्याला गाठून चाकूच्या धाकाने लुटले जात आहे. अशातच लूटमारीतून एकाचा खून झाला. तरीही या वाढत्या गुन्'ांना आळा घालण्यात पोलिस अपयशी ठरल्याने सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी या गुन्'ांनी कळस गाठला असताना, भरीस भर म्हणून घरफोडी व वाटमारीच्या गुन्'ांचा आलेख वाढत आहे. अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. यातच चोºया व लूटमारीच्या घटना दररोज घडू लागल्याने, पोलिस आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सोहेल शर्मा यांनी ‘बेसिक पोलिसिंगवर’ भर देणार असल्याचे सांगितले. त्यांना कार्यभार घेऊन अजून आठ दिवसांचाही कालावधी झालेला नाही.

ज्यादिवशी त्यांनी कार्यभार घेतला, त्याचदिवशी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाटमारीतून एकाचा खून झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एका अल्पवयीन संशयितासह तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर २४ तासात यातील अल्पवयीन संशयित बालसुधारगृहातून पळून गेला. जाताना त्याने आणखी चार अल्पवयीन गुन्हेगारांनाही सोबत नेले. त्यांचा शोध घेण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही.

गेल्या महिन्यापासून नाकाबंदी बंद आहे. बीट मार्शल पथके नुसती कागदावरच दिसत आहेत. रात्रीची गस्त वाढविल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. जर गस्त सुरु असेल, तर मग लूटमारीच्या घटना का घडत आहेत? अत्यंत गजबजलेल्या वखारभागातून गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या हॉटेल कामगाराचे लूटमारीच्या उद्देशातून अपहरण करुन त्याचा खून केला. याप्रकरणी नितीन जाधव या रिक्षाचालकासह तिघांना अटक केली.

हा खून केल्यानंतर आरोपींनी घरी जाऊन अंघोळ केली व पुन्हा सांगलीत येऊन त्यांनी दुसरा लूटमारीचा गुन्हा केला. रस्त्यावर पोलिसच दिसत नसल्याने गुन्हेगार खुलेआम गुन्हे करीत आहेत. पोलिसांची भीती आणि दरारा पूर्णपणे कमी झाला आहे. सामान्य माणसाला आज सुरक्षेची भावना वाटत नसल्याचे चित्र आहे. बसस्थानक, कोल्हापूर रस्ता, गोकुळनगर, शिंदे मळ्यातील रेल्वे ब्रीज ही ठिकाणे लूटमारीसाठी प्रसिद्ध ठरत आहेत.
जुन्या पोलिसांवर विश्वास नाही
सहा महिन्यांपूर्वी सांगली शहर, संजयनगर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या अधिकाºयांचे खांदेपालट झाले. नवे अधिकारी लाभले. परंतु त्यांना अजून शहराची माहिती झाली का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या दिमतीला सहाय्यक अधिकारी व ‘डीबी’चे पथक आहे. तरीही वाढत्या घरफोडी व वाटमारीच्या गुन्'ांना ते आळा घालू शकले नाहीत. या तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांत ‘अर्धा’ डझन खून झाले आहेत. जुने पोलिसांचे अजूनही ‘खबºयांचे’ नेटवर्क आहे; पण सध्याचे अधिकारी त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नाहीत. परिणामी जुने पोलिस मिळेल ती ड्युटी करून सेवानिवृत्तीच्या तारखेकडे डोळे लावून आहेत.

पथके कागदावरच!
विशेष पथक, गुंडाविरोधी पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही घरफोडी, चेनस्नॅचिक व वाटमारीतील गुन्हेगारांपुढे हात टेकले असल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात अनेक दिग्गज व जुन्या कर्मचाºयांचा अजूनही भरणा आहे. त्यांना शहराची व गुन्हेगारांची माहिती आहे. तरीही घडलेला एक गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले नाही. मटका व दारू जप्त करण्याशिवाय ते काहीच करीत नाही. गुंडाविरोधी पथक दोन महिन्यांपासून कोमात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पिस्तूल तस्करीच्या तपासानंतर अदृश्य झाला आहे. पोलिस ठाण्यातील ‘डीबी’ पथके नावालाच उरली आहेत.

कारवाया बंद
नाकाबंदी, गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग आॅपरेशन या कारवाया बंद झाल्याने गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. बसस्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडा बाजारात मोबाईल, दागिने लंपास होत आहेत. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस आहेत का नाहीत? ते करतात तरी काय? असा सवाल होत आहे.

 

Web Title:  Sangli's house boom continues; : Citizens frighten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.