शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सांगलीकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 1:35 PM

सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला.

ठळक मुद्देसांगलीकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिन’सावल्या झाल्या गायब : मुलांनी लुटला वैज्ञानिक प्रयोगाचा आनंद

सांगली : सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला.सांगलीत दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी सावल्यांच्या लपाछपीचा खेळ सुरू झाला. काही मिनिटातच पुन्हा सावल्या पूर्ववत दिसू लागल्या. खगोलीय चमत्काराच्या या घटनांचा आनंद विज्ञानप्रेमींसह नागरिकांनी लुटला. गेल्या काही दिवसांपासून आकाश निरभ्र असल्यामुळे हा खगोलीय खेळ पाहण्याचा आनंद नागरिकांना मिळू शकला.

सांगलीत दरवर्षी विज्ञानप्रेमी संघटनांकडून शून्य सावलीनिमित्त वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदाही काचेच्या टिपॉयवर वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्यांची सावली गायब होतानाचे प्रयोग दाखविण्यात आले. यंदा वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा दिवस अनुभवता येणार आहे.मराठी विज्ञान परिषद आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दोन दिवसांपूर्वी शून्य सावली कशी अभ्यासावी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्ष या प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी अनुभवले. या खगोलीय घटनेविषयीका होते असे...कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोनवेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला २३.५ डिग्रीएवढा कल आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर ३ महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. यादिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो. वेगवेगळ्या वृत्तांवर वेगवेगळ्या काळात शून्य सावलीचा अनुभव येत असतो.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसSangliसांगली