Sangli ZP Election Voting 2026: कांदे येथील नवरदेवाने डोक्याला मुंडावळ्या बांधूनच बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:31 IST2026-02-07T16:31:21+5:302026-02-07T16:31:45+5:30
मांगले : कांदे (शिराळा) येथील उच्चशिक्षीत तरुण विपुल आनंदराव पाटील यांचा विवाह पूर्वनियोजीत वेळेप्रमाणे ठरला होता. मतदान दोन दिवस ...

Sangli ZP Election Voting 2026: कांदे येथील नवरदेवाने डोक्याला मुंडावळ्या बांधूनच बजावला मतदानाचा हक्क
मांगले : कांदे (शिराळा) येथील उच्चशिक्षीत तरुण विपुल आनंदराव पाटील यांचा विवाह पूर्वनियोजीत वेळेप्रमाणे ठरला होता. मतदान दोन दिवस पुढे ढकलल्याने लग्नादिवशीचमतदान आले. त्यामुळे नवरदेव असलेल्या विपूल यांनी डोक्याला मुंडावळ्या बांधून सकाळी पवित्र मतदानाचा हक्क बजावला. आणि दुपारी मांगले येथील कार्यालयात विवाहबद्ध झाले.
विपुल आनंदराव पाटील हे एका साखर कारखान्यात अल्कोटेक इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांचा आज, ७ फ्रेबुवारी रोजी विवाह ठरला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या. त्यामुळे योगायोगाने लग्नादिवशीच मतदान आले.
त्यामुळे विपुल यांनी सकाळी गावदेव करून मुंडावळ्यासह कांदे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजाविला. आणी दुपारी मांगले येथील साई समर्थ हॉलमध्ये बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील मयुरी हिच्याशी १२: ५५ या शुभमुहूर्तावर विवाह बद्ध झाले.