शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: शिराळ्यात उडाला भाजपचा धुव्वा, दोन्ही राष्ट्रवादीने उधळला गुलाल

By संतोष भिसे | Updated: February 9, 2026 14:05 IST

आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी मोठा धक्का

सांगली : भाजपचा आमदार असलेल्या शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र पक्षाची हाराकिरी झाली आहे. कोकरुड या अवघ्या एका गटात पक्षाला विजयाचा गुलाल उधळता आला आहे. उर्वरित तीनही जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती मतदारसंघांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.कोकरुडमध्ये साईतेजस्वी यांच्या समवेत पंचायत समितीसाठी कोकरुड गणातून भाजपचे बाजीराव पाटील आणि कणदूर गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे सम्राटसिंग नाईक निवडून आले आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचा एकत्रित झेंडा फडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपनेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. भाजपचे वर्चस्व असणारी पंचायत समिती हातातून गमवावी लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यासाठी हा विजय महत्वाचा ठरला आहे. मानसिंगराव यांनी विधानसभेतील पराभवाचा उट्टे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काढल्याचे मानले जाते. मांगले गटातून राष्ट्रवादीचे विराज नाईक विजयी झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक गटातून राजेश्वरी रणधीर नाईक, वाकुर्डे गणातून रवींद्र आढाव आणि पाचुंब्रे गणातून सविता महाडिक हे अजित पवार गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Routed in Shirala ZP Election; NCP Celebrates Victory.

Web Summary : In Shirala, despite a BJP MLA, NCP dominated ZP elections. BJP won only one group. NCP's Naik gains, avenging past losses. A major setback for BJP leaders.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीResult Dayपरिणाम दिवसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार