Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

By अविनाश कोळी | Updated: February 9, 2026 11:49 IST2026-02-09T11:48:20+5:302026-02-09T11:49:55+5:30

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का; भाजपच्या पदरी निराशा, कडेगाव तालुक्यात एक जागा वगळता सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

Sangli ZP Election Results 2026 Congress MLA Vishwajit Kadam's shock to BJP's Deshmukh brothers, Congress candidate in the lead | Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

Sangli ZP Election Results 2026: सांगलीत भाजपला धक्का, काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर 

सांगली : कडेगाव तालुक्यातील कडेपूर पंचायत समिती गण वगळता सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतही सरस कामगिरी केली असून एकत्र आलेल्या पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख या बंधुंना धक्का दिला आहे. 

कडेगाव तालुक्यापुरता मर्यादित नसलेला हा निकाल सांगली जिल्ह्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. मागील निवडणुकीत भाजपने चारपैकी तीन जिल्हा परिषद गटांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले होते, तर आठपैकी सहा पंचायत समिती गणात भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे भाजपसमोर आपले वर्चस्व टिकवण्याचे, तर काँग्रेससमोर पुन्हा सत्ता मिळवण्याचे मोठे आव्हान होते. 

माजी आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने संपूर्ण तालुक्यात प्रचारयंत्रणा राबवली. दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांनी संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे व मागील यशाचा आधार घेत भाजपनेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या लढाईत काँग्रेसनेच बाजी मारल्याचे सध्याचे चित्र आहे. कडेपूर जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस व भाजप उमेदवारात चूरस असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Web Title : सांगली ZP चुनाव 2026: कांग्रेस आगे, बीजेपी को झटका

Web Summary : सांगली ZP चुनावों में कांग्रेस अधिकांश क्षेत्रों में आगे, बीजेपी को झटका लगा। विश्वजीत कदम का नेतृत्व प्रभावी साबित हुआ। बीजेपी सत्ता बरकरार रखने की कोशिश में थी, वहीं कांग्रेस का लक्ष्य इसे वापस पाना है। सबकी निगाहें कडेपुर के नतीजे पर हैं।

Web Title : Sangli ZP Election 2026: Congress Leads, Setback for BJP

Web Summary : In Sangli ZP elections, Congress leads in most constituencies, dealing a blow to BJP. Vishwajit Kadam's leadership proves effective. While BJP tried retaining power, Congress aims to reclaim it. All eyes are now on Kadepur result.