शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदल नेत्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:17 IST

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, नानासाहेब महाडिक यांनी हिरवा कंदील दाखविला, तरच पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करायची भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. या नेत्यांना डावलून पदाधिकाºयांचे राजीनामे घेतल्यास भाजपचे जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित बिघडण्याची भीती आहे. ...

ठळक मुद्देसत्ताधारी कोंडीत : बाबर, घोरपडे, शेट्टी, महाडिक गटाचे मत निर्णायक

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्हा परिषदेत भाजपला काठावरचे बहुमत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, नानासाहेब महाडिक यांनी हिरवा कंदील दाखविला, तरच पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करायची भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. या नेत्यांना डावलून पदाधिकाºयांचे राजीनामे घेतल्यास भाजपचे जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

जिल्हा परिषदेत भाजपकडे २५ सदस्य संख्या असून, बहुमतासाठी त्यांना सहा सदस्यांची गरज आहे. पहिल्या टप्प्यातील सव्वा वर्षासाठीचे गणित जमविताना शिवसेना तीन, रयत विकास आघाडी चार, विकास आघाडी दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक अशा दहा सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे पस्तीसवर सदस्यसंख्या पोहोचली होती. या मित्रपक्षांपैकी शिवसेना, रयत विकास आघाडीला सत्तेत सामावून घेण्यात आले आहे; पण घोरपडे आणि शेट्टी समर्थकांना सत्तेत संधी दिलेली नव्हती. पुढील कालावधित या सदस्यांना संधी देण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे समजते. मात्र खा. शेट्टींनी भाजपपासून फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक केली आहे. त्यामुळे भाजपकडे ३४ सदस्य संख्या राहणार आहे.

खा. संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील संघर्षही टोकाला गेला आहे. घोरपडे यांनी सध्या भाजपपासून फारकत घेत राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांचे दोन सदस्य आहेत. शिवसेनेचे तीन सदस्य असून, आ. अनिल बाबर यांचे भाजपच्या एका गटाशी जुळते, तर दुसºया गटाशी जुळत नाही. आ. बाबर यांचे पुत्र सुहास सध्या जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष आहेत.

आ. बाबर यांच्याशी संपर्क साधला असता, भाजपने अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू. नानासाहेब महाडिक समर्थक रयत विकास आघाडीत दोन सदस्य असल्यामुळे त्यांचीही भूमिका निर्णायक आहे. या सर्वांचे गणित जमविल्याशिवाय पदाधिकाºयांचे राजीनामे घ्यायचे नाहीत, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या दुसºया गटाचे सध्याच्या पदाधिकाºयांशी फारसे जमत नसल्याने काही सदस्यांमार्फत पदाधिकारी बदलाच्या मागणीने उचल खाल्ली आहे. या सदस्यांना भाजपचे नेते कसे शांत करणार, हेही महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसांत भाजपच्या कोअर कमिटीमध्ये यावर फैसला होण्याची अपेक्षा आहे.दावेदार : तीन तालुक्यातील सदस्यविद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या निवडीवेळी भाजपअंतर्गत मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. खासदार संजयकाका पाटील यांनी चुलते डी. के. पाटील यांना अध्यक्षपद मिळावे, असा आग्रह धरला होता. पण पाटील यांची ती संधी हुकली. सध्या त्यांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कवलापूर (ता. मिरज) गटातून भाजपचा विजय खेचून आणलेले शिवाजी डोंगरे हेही अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मागील निवडीवेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्जही भरला होता. त्यांना सव्वा वर्षानंतर अध्यक्षपदाची संधी देण्याचे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी शांत केले होते. आता जत तालुक्यातून भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून गेल्यामुळे तालुक्याला अध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. हा कलह लक्षात घेता, नूतन पदाधिकारी निवड भापजच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पदाधिकारी बदलाच्या निमित्ताने भाजपच्या दोन गटातील संघर्षही पाहायला मिळणार आहे.निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : पृथ्वीराज देशमुखजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची कोअर कमिटीच घेणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार पदाधिकारी बदल होतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.पदाधिकारी बदलाबाबत सदस्य आणि पक्षाचे नेते, मित्रपक्ष, संघटनांच्या नेत्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर पदाधिकारी बदलाबाबत धोरणात्मक निर्णय होईल. जत तालुक्यातील भाजपची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे ज्यावेळी बदल होईल, त्यावेळी अध्यक्षपदावर आमचा दावा राहील,- आ. विलासराव जगताप, जत

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदPoliticsराजकारण