कोकरुडच्या शिराळा पश्चिम भागात रविवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील सर्व ओढे, नाले, बंधारे भरुन वाहीले. या पावसाचा खरीप हंगामातील मशागतीला फायदा होणार आहे. गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येळापूर, मेणी, हत्तेगाव परिसरात पावसाने सुरवात केली. सलग दोन तास अतिवृष्टि सदृश्य पावसाने परिसराला झोडपून काढले. त्यानंतर पावसाने परिसरातील सर्व गावात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले. जनावरांसाठी गोळा करून ठेवलेल्या गवताच्या गंजीत पाणी शिरल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला.
सांगलीत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 20:20 IST