शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मिरज तालुक्यात बागायत जमिनींचा प्रश्न जटील, चुकीच्या नोंदीने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:55 IST

मिरज तालुक्यातील नदीकाठच्या जमिनींच्या नोंदी जिरायत म्हणून झाल्याने निर्माण झालेला गोंधळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेने आॅनलाईन सातबाऱ्यांच्या नोंदीत बरेच गोंधळ दिसून येत असल्याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देभूसंपादनावेळी बसणार शेतकऱ्यांना फटकापाणीपट्टीला एक नियम, नुकसानभरपाईला वेगळाजिरायतीच्या सातबाऱ्याला बारमाही पिकेशेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी

सांगली : मिरज तालुक्यातील नदीकाठच्या जमिनींच्या नोंदी जिरायत म्हणून झाल्याने निर्माण झालेला गोंधळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेने आॅनलाईन सातबाऱ्यांच्या नोंदीत बरेच गोंधळ दिसून येत असल्याची तक्रार केली आहे.

पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी कसबे डिग्रज येथील शेतकरी अशोक रामू तोडकर व बाळासाहेब यशवंत पाटील या दोन शेतकऱ्यांची अनुक्रमे ३८ गुंठे व १५ गुंठे कृष्णा नदीकाठची शेतजमीन २००७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली होती. या दोन्ही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली अद्याप मिळाली नाही.

शेतकरी संघटनेने याबाबतचा पाठपुरावा करून पाटबंधारे विभागास नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्यास भाग पाडले. मात्र पाटबंधारे विभागाने शेतजमिनीचे मूल्यांकन जिरायत नोंदीमुळे ५० टक्के कमी दाखविले.

मूल्यांकनाबाबत तहसीलदारांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात आला. संपूर्ण मिरज तालुकाच आॅनलाईन सात-बारावर जिरायत झाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे हा प्रश्न आता जटील बनला आहे. नोंदीत बदल करण्याचे अधिकार आता नेमके कोणाचे हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मिरज तालुक्यामध्ये अनेक शासकीय कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयव राज्य महामार्गांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कसबे डिग्रजप्रमाणे अन्य बागायती शेतींचेही मुल्यांकन कमी होणार आहे. यात मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न अधिक जटील होण्याची चिन्हे आहेत.

पाणीपट्टीला एक नियम, नुकसानभरपाईला वेगळाज्या जमिनी बागायत असूनही जिरायत म्हणून नोंद झाल्या त्यांना नुकसानभरपाई देताना जिरायतचा नियम लावला जातो आणि पाणीपट्टी बागायती म्हणून केली जाते. शेतसाराही तसाच गोळा केला जातो. त्यामुळे शासकीय दप्तरीही सुरू असलेला गोंधळ समोर आला आहे. त्यामुळेच शेतकरी संघटनेने याबाबत संताप व्यक्त केला आहे.जिरायतीच्या सातबाऱ्याला बारमाही पिकेज्या सातबारा उताऱ्यावर वरच्या बाजुस जिरायत नोंद केली आहे, त्याच उताऱ्यावर खाली बागायती बारमाही पिकांची नोंदही दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे उतारे आॅनलाईनला नोंदले जात असताना अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर हक्कातही भूसंपादनाचा उल्लेख नाही.

 

शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावीतलाठ्यांच्या नोंदी करण्याची पद्धत सदोष आहे. त्यामुळे मिरज तालुक्यातील जमिनींच्या चुकीच्या नोंदी झाल्याचे प्रकरण गंभीर आहे. याप्रश्नी शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी. आपल्या जमिनींच्या नोंदीबाबत तपासणी करून घ्यावी. ज्यामुळे भविष्यात कोणतेही आर्थिक नुकसान किंवा अडचणी येता कामा नयेत.- प्रा. शरद पाटील, माजी आमदार, प्रदेशाध्यक्ष जनता दल

 

जाणीवपूर्वक चुकाहा प्रकार शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे आॅनलाईन सातबाऱ्यांच्या एकाच तालुक्यातील सर्वच्या सर्व नोंदी कशा काय चुकू शकतात, याचे आकलन कोणालाही होत नाही. अनेक प्रकारच्या चुका आॅनलाईन सातबारा उताऱ्यांत दिसत आहेत. या दुरुस्त्या तातडीने करून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळावे.- सुनील फराटे, शेतकरी संघटना, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी