सांगली : पलूसमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने नगररिषदेतील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजपला याठिकाणी केवळ एका जागेवर विजय मिळविता आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागांवर विजय मिळविला. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत यंदा भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केले होते. रणनीती तयार करुन काँग्रेसची सत्ता काबीज करण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १६ जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवली. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजिवनी पुदाले विजयी झाल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला.
Web Summary : Congress retained power in Palus Nagar Parishad, led by Vishwajeet Kadam, winning 16 seats. BJP secured only one seat, while the NCP (Ajit Pawar faction) won four. Efforts by the opposition to unseat Congress were unsuccessful, solidifying Kadam's influence.
Web Summary : कांग्रेस ने विश्वजीत कदम के नेतृत्व में पलूस नगर परिषद में सत्ता बरकरार रखी, 16 सीटें जीतीं। भाजपा को केवल एक सीट मिली, जबकि राकांपा (अजित पवार गुट) ने चार सीटें जीतीं। कांग्रेस को हटाने के विपक्ष के प्रयास विफल रहे, जिससे कदम का प्रभाव मजबूत हुआ।