Sangli Municipal Election Result 2026 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज निकाल हाती आले आहेत. भाजपाने सर्वाधिक महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस या पक्षांनी तगडे आवाहन दिले होते. पण, भाजपाने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
सांगलीत आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांनी भाजपाला टक्कर दिली होती. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोठी लढत देत विजय मिळवला आहे.
सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विजयी उमेदवार खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी)रवींद्र सदामते माया गडदे पद्मश्री पाटील चेतन सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 2
प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप) गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी) मालुसरे महावीर खोत (भाजप ) प्रकाश रमेश पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक 3संदीप आवटी भाजपाशिवसेनेचे सागर वनखंडे राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी
प्रभाग क्रमांक 4 निरंजन सुरेश आवटे भाजप मोहन दत्तात्रय वाटवे भाजप विद्या बाबासाहेब नलवडे भाजप अपर्णा विवेक मोटे भाजप
प्रभाग क्रमांक 5शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अपबबिता मेंढे काँग्रेससंजय मेंढे काँग्रेसकरण जामदार राष्ट्रवादी अप
प्रभाग क्रमांक 6मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अपअजून काजी राष्ट्रवादी उपबिलकीश बुजरूक काँग्रेस मुब्बशिरीन बागवान काँग्रेस
प्रभाग क्रमांक 7 भाजपागणेश माळीभाजपच्या बानु जमादार उज्वला कांबळे दयानंद खोत
प्रभाग क्रमांक 08विष्णू माने राष्ट्रवादी अपदीपक वायदंडे भाजपामीनाक्षी पाटील योगिता राठोड भाजपा
प्रभाग क्रमांक 9 भाजपा संतोष पाटील वर्षा सरगर रोहिणी पाटील अतुल माने
प्रभाग क्रमांक 10जगन्नाथ ठोकळे भाजपागीता पवार भाजपावर्षा निंबाळकर काँग्रेसप्रकाश मुळके भाजपा
प्रभाग क्रमांक 11 हर्षवर्धन पाटील काँग्रेस अश्विनी कोळेकर काँग्रेस रमेश सरजे काँग्रेसअंजली जाधव काँग्रेस
प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी)लक्ष्मी सरगर रईसा शिकलगारसंजय यमगर धीरज सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 13 मधून अभिजीत कोळी विजयी राष्ट्रवादीदिपाली दिलीप पाटील विजयी काँग्रेसअश्विनी चेतन कदम विजयी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 14 युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गटअनिता पवार भाजप मनीषा कुकडे भाजप उदय बेलवलकर भाजप
प्रभाग क्रमांक 15 काँग्रेसमंगेश चव्हाण फिरोज पठाण स्मिता यमगरसोनल पाटील सावर्डेकर
प्रभाग क्रमांक 16 स्वाती शिंदे भाजपाराजेश नाईक काँग्रेससलमा शिकलगार काँग्रेसमयूर पाटील काँग्रेस
प्रभाग क्रमांक 17 दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप )साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप) प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप) लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )
प्रभाग क्रमांक 18 अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप नसीमा नाईक राष्ट्रवादी अप वैशाली राजू गवळी भाजपा गाथा जगदाळे भाजपा
प्रभाग क्रमांक 19 युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप अलका ऐवळे भाजपा सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप कीर्ती देशमुख भाजपा
प्रभाग क्रमांक 20अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अपअश्विनी कोळी राष्ट्रवादी अप
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी 39शिवसेना शिंदे गट 2 काँग्रेस 18राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) 16राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) 3 पक्षीय बलाबल आहे
वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून उत्कंठा वाढवणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ मधील लढतीत वसंतदादा पाटील यांचे पणतू हषवर्धन पाटील यांनी विजयी मिळवला. हषवर्धन यांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा पराभव केला. दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन यांनी महापालिकेत ‘एंट्री’ केली. त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरूद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिले होते. तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती.
Web Summary : In the 2026 Sangli Municipal Election, BJP secured a clear majority, defeating key opposition leaders. Vasantdada Patil's great-grandson, Harshvardhan Patil, won, marking his entry into municipal politics. BJP won 33 seats, NCP (Ajit Pawar) 13, NCP (Sharad Pawar) 9, and Shiv Sena (Shinde) 2.
Web Summary : 2026 के सांगली नगर निगम चुनाव में भाजपा ने स्पष्ट बहुमत हासिल किया, प्रमुख विपक्षी नेताओं को हराया। वसंतदादा पाटिल के परपोते हर्षवर्धन पाटिल ने जीत दर्ज की, जो नगर पालिका की राजनीति में उनकी एंट्री है। भाजपा ने 33 सीटें, एनसीपी (अजित पवार) ने 13, एनसीपी (शरद पवार) ने 9 और शिवसेना (शिंदे) ने 2 सीटें जीतीं।