शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:30 IST

महासभा १८ रोजी : ड्रेनेज, पाण्यावर चर्चा, गुंठेवारी समिती गठित होणार

सांगली : महापालिकेत स्वीकृत आठ नगरसेवकांच्या निवडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर नगररचना विभागाने विषयपत्र न दिल्याने गुंठेवारी समितीबाबत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, येत्या १८ रोजी महापालिकेची विशेष सभा होत आहे. या सभेत पाणी, अपूर्ण ड्रेनेज योजनेवरच चर्चा होणार आहे. तर निवडीची प्रक्रिया पुढील महिन्यातील सभेत होण्याची शक्यता आहे.महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची सत्ता आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, महिला व बाल कल्याण समिती, समाजकल्याण समिती सदस्यांची निवड झाली आहे. तर येत्या १३ मार्च रोजी सभापतींची निवड होणार आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मागील महासभेत गुंठेवारी समितीही गठित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार येत्या महासभेत गुंठेवारी समितीसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची शक्यता होती.महापालिकेतील संख्याबळानुसार आठ स्वीकृत सदस्य होणार आहेत. यात भाजपचे चार, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रत्येक दोन सदस्य असणार आहेत. भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी माजी उपमहापौर शेखर इनामदार, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे, विश्वजीत पाटील, मनोज सरगर इच्छुक आहेत.तर काँग्रेसकडून कृष्णाई समूहाचे प्रतापराव चव्हाण, माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलकुटगी यांच्यासह २० पेक्षा अधिक जण शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगरसेविका स्नेहल सावंत, जमील बागवान, बिरेंद्र थोरात यांची नावे चर्चेत आहेत. तर गुंठेवारी समितीत १६ सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेची सभा १८ रोजी होत आहे. या सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होण्याबाबत साशंकता आहे. पक्षाकडूनही तशा सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे हा विषय एप्रिल महिन्याच्या सभेत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर गुंठेवारी समितीबाबत नगररचना विभागाकडून अद्याप विषयपत्र आलेले नाही. येत्या दोन दिवसांत विषयपत्र आल्यास गुंठेवारी समिती गठित करण्याचा विषय अजेंड्यावर येण्याची शक्यता आहे.

बजेट महासभा की स्थायीकडे?गत सभेत महापौर सूर्यवंशी यांनी, १२ अथवा १३ मार्चपर्यंत यंदाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करावे; पण या कालावधीत स्थायी समिती सभापती निवड न झाल्यास महासभेकडे सादर करण्याची सूचना प्रशासनाला दिली होती. त्यात आता १३ रोजी स्थायी सभापतींची निवड होणार आहे. परिणामी प्रशासनाची कोंडी झाली आहे. त्यात परंपरेनुसार स्थायीकडून महासभेकडे बजेट जावे, असाही एक मतप्रवाह सत्ताधारी गटात आहे. त्यावर काय निर्णय होते, याकडे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation: Co-opted Corporator Elections Likely to Be Postponed

Web Summary : Sangli Municipal Corporation's co-opted corporator elections are likely delayed. A special meeting will focus on water and drainage issues. Budget submission is debated between the standing committee and general assembly. Uncertainty surrounds the formation of the Gunthewari Committee due to departmental delays.