शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजप काँग्रेसला देणार सभापतिपद, नेमकं कारण काय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:53 IST

पदाधिकाऱ्यांचा विरोध, आज निवडीची सभा

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभापतींची उद्या, शुक्रवारी निवडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी काँग्रेसला एका प्रभाग समितीचे सभापतिपद देण्याच्या हालचाली सुरू आहे. सत्ताधारी भाजप व काँग्रेस नेत्यामध्ये दिवसभर खलबते सुरू होती. पण विरोधकांना पद देण्यास महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही.महापालिकेच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण, समाजकल्याण समिती व चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवडीसाठी उद्या सभा बोलाविण्यात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्थायी समिती, समाजकल्याण व प्रभाग समिती ३ च्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.या तिन्ही सभापतिपदासाठी विरोधी काँग्रेसने अर्ज दाखल केलेले नाही तर महिला बालकल्याण व उर्वरित तीन प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी महापौर, उपमहापौर निवडीही काँग्रेसने बिनविरोध केल्या होत्या. त्यामुळे आताच्या निवडी बिनविरोध व्हाव्यात, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

गुरुवारी दिवसभरात भाजपचे नेते सुरेश आवटीसह नेत्यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसने प्रभाग समिती एकचे सभापतिपद देण्याची मागणी केली. त्या बदल्यात इतर सभापतीच्या निवडी बिनविरोध करण्याची तयारी दर्शविली पण त्याला महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. सर्वच विषय समितीत भाजप व राष्ट्रवादीचे बहुमत आहे. त्यामुळे विरोधकांना सभापतिपद कशासाठी द्यायचे, असा प्रश्न भाजपचा नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे तरीही भाजपच्या नेत्यांनी मात्र बिनविरोधसाठी काँग्रेसला एक सभापतिपद देण्याची तयारी चालविली आहे. त्यावर दिवसभरात बरीच खलबते झाली. पण निर्णय होऊ शकला नाही. आता उद्या शुक्रवारी पुन्हा सकाळी त्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, सभापती निवडीची प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरू होईल. तोपर्यंत दोन्ही पक्षांचा निर्णय होणार आहे.

प्रभाग समितीच्या रचनेत बदलप्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व कायम रहावे, यासाठी यंदा बदल करण्यात आले. प्रभाग १६ हा प्रभाग समिती दोनमध्ये जोडला गेल्या. नैसर्गिक न्यायाने प्रभाग १६ हा प्रभाग समिती एकमध्येच हवा होता, असा दावा काँग्रेसने केला आहे. जनतेनेच भाजपला एका प्रभाग समितीत बहुमत दिलेले नाही. केवळ तोडफोड करून सत्तेच्या जीवावर वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. जनादेशानुसार एक सभापतिपद काँग्रेसला मिळाल्याच हवे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli BJP May Give Committee Chair to Congress: Here's Why

Web Summary : Sangli BJP considers giving Congress a committee chair amid internal opposition. Congress demands a committee post, threatening election opposition. A final decision is awaited.