डफळापूर (जि. सांगली) : डफळापूर (ता. जत) येथील शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. सुशीला विट्ट्याप्पा पडोळकर (वय ६०) आणि अनिल विट्ट्याप्पा पडोळकर (वय २५, रा. अकोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव), अशी मृतांची नावे आहेत.सुमारे आठशे मेंढ्यांसह मेंढपाळांचा समूह डफळापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर दिलीप भोसले यांच्या शेतात मुक्कामी होता. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुशीला पडोळकर पाणी आणण्यासाठी शेततळ्यात उतरल्या. मात्र, पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात पडल्या. आईचा आक्रोश ऐकताच, चार नातेवाइकांनी तत्काळ पाण्यात उड्या मारून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तळ्यात अकरा फूट पाणी, प्लास्टिक अस्तर आणि निसरडा तळ यामुळे सर्वांनाच बाहेर पडणे अशक्य झाले. जवळपास पंधरा मिनिटे जीव वाचविण्यासाठी संघर्ष सुरू होता. दरम्यान, शेजारच्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तळ्यात दोर टाकून हल्लाप्पा बासणे, सुनीता बासणे आणि लक्काप्पा पडोळकर यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, सुशीला पडोळकर आणि त्यांचा मुलगा अनिल यांना वाचविण्यात अपयश आले. दोघांचाही जागीच बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
Web Summary : In Sangli, a mother and son drowned in a farm pond in Daphalapur. Susheela Padolkar, 60, and her son Anil, 25, died after Susheela slipped while fetching water. Three relatives who tried to save them were rescued by nearby farmers using ropes.
Web Summary : सांगली के डफलापुर में एक खेत तालाब में डूबने से एक माँ और बेटे की मौत हो गई। सुशीला पडोलकर (60) और उनके बेटे अनिल (25) की पानी लाते समय फिसलने से मौत हो गई। उन्हें बचाने की कोशिश करने वाले तीन रिश्तेदारों को पास के किसानों ने रस्सियों का उपयोग करके बचाया।