शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

सांगली : संभाजी भिडेंच्या भेटीसाठी आमदारांनी थांबविली एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:19 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेण्यासाठी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सांगलीत वाटेतच एसटी बस अडविली. बसमध्येच भिडेंची भेट घेऊन दहा मिनिटे चर्चा केली आणि प्रवाशांची माफी मागून त्यांनी निरोप घेतला.

ठळक मुद्देसंभाजी भिडेंच्या भेटीसाठी आमदारांनी थांबविली एसटीप्रवाशांची मागितली माफी : नरेंद्र पाटील यांची धावाधाव

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेण्यासाठी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सांगलीत वाटेतच एसटी बस अडविली. बसमध्येच भिडेंची भेट घेऊन दहा मिनिटे चर्चा केली आणि प्रवाशांची माफी मागून त्यांनी निरोप घेतला.नरेंद्र पाटील सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांच्याशी संपर्क साधला. भिडे यांना भेटण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी चौगुले यांनी संभाजी भिडे बसमधून बाहेरगावी जात असल्याचे सांगितले.

नरेंद्र पाटील यांनी कोणत्या मार्गाने बस जात आहे, याबाबत विचारणा केली. त्यानंतर सांगली-मिरज रस्त्यावरून जाणाऱ्या या बसचा क्रमांक घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील चौकात बस थांबविण्याची विनंती त्यांनी केली. चालकानेही शासकीय वाहनांचा ताफा व नरेंद्र पाटील यांच्या विनंतीवरून बस थांबविली.

नरेंद्र पाटील यांनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. महामंडळावर निवड झाल्याबद्दल भिडे यांनी नरेंद्र पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी नितिन चौगुलेही उपस्थित होते.

जवळपास दहा मिनिटांच्या या भेटीनंतर आमदार पाटील यांनी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली. चालक व वाहकांचे आभार मानून त्यांनी निरोप घेतला. प्रवाशांनीही या भेटीबाबत आणि त्यामुळे ताटकळत राहिल्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSangliसांगलीstate transportराज्य परीवहन महामंडळ