शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरजेत घरोघरी प्लास्टिक कचरा संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST

मिरजेतील निसर्ग संवाद व महापालिका क्षेत्र प्लास्टिक कचरामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ताे पुनर्वापरासाठी ...

मिरजेतील निसर्ग संवाद व महापालिका क्षेत्र प्लास्टिक कचरामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ताे पुनर्वापरासाठी पाठविण्यात येताे. विघटन न होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने या समस्येवर उपाय म्हणून घराघरातून प्लास्टिक कचरा संकलनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात घरातील, परिसरातील सर्व प्लास्टिक एका पोत्यात एकत्र करून संस्थेची गाडी महिन्यातून एकदा घरी आल्यानंतर देण्यात येतो. हा एकत्रित केलेल‍ा कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात येतो.

मिरजेत सुरू झालेले प्लास्टिक कचरा संकलन आता सांगलीतही सुरू झाले आहे. वासंती लेले, हिमांशू लेले, संजय कट्टी, महेश कुलकर्णी, राजेंद्र जोशी, अर्चना लेले यांच्यासह अनेकांचा यामध्ये सहभाग आहे. काही ज्येष्ठ नागरिकांचे गटही या उपक्रमाच्या प्रचारात सहभागी आहेत. वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमात कोरोनामुळे काही काळ खंड पडला हाेता. गेल्या महिन्यापासून पुन्हा या उपक्रमास सुरुवात झाली आहे.

महापालिका किंवा अन्य कोणाच्या मदतीशिवाय कचरा संकलनासाठी येणारा खर्च संस्थेच्या सदस्यांकडून करण्यात येत असल्याचे या उपक्रमाचे मार्गदर्शक राजेंद्र जोशी यांनी सांगितले. सध्या दरमहा सुमारे अडीचशे किलो प्लास्टिक कचरा संकलन होत आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक चिदंबर कोटिभास्कर यांनीही या उपक्रमासाठी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढवून शहरातील काही प्रभाग प्लास्टिकमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्ग संवादतर्फे सायकल चालवा अभियान, वसुंधरा महोत्सव, कापडी पिशव्या वाटप यासह विविध उपक्रम सुरू आहेत.

प्रत्येकाने प्लास्टिक संकलनाचा स्वतः संकल्प करून, आपल्या स्नेही नातलगांना प्लास्टिक कचऱ्यात न टाकण्याबद्दल सांगावे. भविष्यात हा संकल्प प्रत्येकाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असेही राजेंद्र जोशी यांनी सांगितले.

फाेटाे : ०१ मिरज १