शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

सांगली : कृषि यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करावा : काळम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 4:51 PM

कृषि विभागाने संयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून नियोजित जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिल्या. इस्लामपूर येथे दिनांक 27 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

ठळक मुद्दे इस्लामपूर येथे दिनांक 27 ते 31 जानेवारी 2018 दरम्यान जिल्हा कृषि महोत्सवप्राथमिक नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत सूचनाउत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचेही आयोजन प्रस्तावित

सांगली : कृषि विभागाने संयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून नियोजित जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी  येथे दिल्या.

इस्लामपूर येथे दिनांक 27 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भात प्राथमिक नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक एल. पी. धानोरकर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय प्रदीप सुर्वे, अग्रणी जिल्हा बँकेचे लक्ष्मीकांत कट्टी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विस्ताराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी व अन्य शेतकऱ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा कृषि महोत्सवच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच, यातून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध करू शकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, प्रस्तावित जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना, उपक्रम, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पूरक व्यवसाय इत्यादिंबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.

कृषि प्रदर्शनाबरोबरच कृषि परिसंवाद, अनुभवी शेतकरी, उद्योजक यांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंतांची भेट घडवावी व सामान्य शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होणे अपेक्षित आहे.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच, फळे, फुले व भाजीपाला महोत्सवाचेही आयोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी नियामक मंडळाच्या समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी पार पाडावयाच्या जबाबदारीचे नियोजन करण्यात आले. महोत्सवामध्ये जवळपास 200 स्टॉल्स उभे करण्यात येणार आहेत.

महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच आपत्कालीन यंत्रणा इत्यादिबाबत सतर्क राहावे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणा, कृषि संबंधित महामंडळे, बँका, आरोग्य विभाग आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Sangliसांगलीagricultureशेती