मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट-- विजय काळम :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:01 AM2017-10-11T00:01:38+5:302017-10-11T00:03:05+5:30

सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल

 Matoshree has revealed adulteration in the petrol pump - Vijay Kalam: | मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट-- विजय काळम :

मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट-- विजय काळम :

googlenewsNext
ठळक मुद्देपरवाना निलंबनाची शिफारसया पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिली.
बायपास रस्त्यावर महेंद्र भालेराव (रा. जळगाव) यांचा मातोश्री पेट्रोलपंप आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली. २६ सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हाधिकारी काळम-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पंपावर छापा टाकला होता. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वैध मापन निरीक्षक आर. पी काळकुटे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक जे. एस. जोसेफ असे प्रमुख अधिकारी कर्मचाºयांसह पंपावर दाखल झाले होते.
सुमारे तीन तासांहून अधिक काळ पंपाची तपासणी सुरू होती. यावेळी पेट्रोल भरण्याच्या यंत्रामधील सील तोडले असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, पेट्रोलची घनता तपासली असता, तीही नियमापेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. ७४० ते ७४६ पर्यंत आवश्यक असणारी घनता ७६८ पर्यंत असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी इंधनामध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच तेथील पेट्रोलचा रंग काळपट असल्याचे निदर्शनास आले होते. पंपावरील स्टॉक रजिस्टरदेखील अद्ययावत नव्हते. अन्य त्रुटी यावेळी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे पंपावरील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये प्रशासनाने व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला. अनेक बाबींमध्ये दोष आढळत पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगलीतील या पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधीत कंपनीकडे बुधवारी करण्यात येणार असल्याचे विजय काळम यांनी सांगितले

पंपचालकांमध्ये खळबळ
अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत खळबळ उडाली होती. त्यानंतर कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता तपासणीत भेसळ स्पष्ट झाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या पेट्रोलपंपांबद्दल तक्रार येईल, त्याठिकाणी तपासणी करण्याची व दोष आढळल्यास कारवाईची जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याने पंपचालकांत खळबळ माजली आहे.

Web Title:  Matoshree has revealed adulteration in the petrol pump - Vijay Kalam:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.