सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:32+5:302021-04-18T04:26:32+5:30

सांगली : शहरातील बायपास रस्त्यानजीक असलेल्या मल्टिप्लेक्सजवळ फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबविण्यात आले. नाकाबंदीमुळे रस्त्यावर ...

The Sangli Dhoom style lengthened the woman's mangalsutra | सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबविले

सांगलीत धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबविले

सांगली : शहरातील बायपास रस्त्यानजीक असलेल्या मल्टिप्लेक्सजवळ फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूम स्टाईलने लांबविण्यात आले. नाकाबंदीमुळे रस्त्यावर असलेल्या कमी गर्दीचा फायदा घेत शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी दिलीप नाईक यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मंगल नाईक या बायपास रोड परिसरातच राहण्यास आहेत. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास नातवासह त्या फिरायला गेल्या होत्या. सध्या शहरात पूर्ण संचारबंदी असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. नेमका याचा फायदा घेत त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी दुचाकीवर येऊन त्यांच्याजवळ दुचाकी थांबवत पाठीमागे बसलेल्या एकाने हिसडा मारून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र घेत तेथून पोबारा केला. काही क्षणातच हा प्रकार घडल्याने नाईक यांनी आरडाओरडा केला; परंतु परिसरातील नागरिक येण्याआधीच संशयित पसार झाले. मंगल नाईक यांचे पती दिलीप नाईक यांनी शहर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.

Web Title: The Sangli Dhoom style lengthened the woman's mangalsutra