शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

सांगली : आमिष मॅनेजरचे; नोकरी वेटरची, धीरज पाटीलचा प्रताप : दहा दिवसांची पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 1:18 PM

मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचा; पण प्रत्यक्षात तो वेटरची नोकरी लावत असे, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

ठळक मुद्देमलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिषचौघांकडून घेतले पाच ते सहा लाख रुपये बँक खाती सील केल्यानंतर धीरज पाटील याच्या मालमत्तेचा शोध

सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी सांगली न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचा; पण प्रत्यक्षात तो वेटरची नोकरी लावत असे, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

संशयित कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली होती. चारही तरुणांना न्यायालयाने तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे तरुण शिक्षा भोगत आहेत.

व्हिसा फसवणूक प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली होती. काही महिन्यांपूर्वी धीरज पाटील हा स्वत: मलेशियात नोकरीसाठी गेला होता. तिथे स्वत: त्याने वेटरची नोकरी केली.

यातून त्याची परदेशी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या काही व्यक्तींशी ओळख झाली. भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. कौस्तुभ पवार हा त्याच्याकडे बेरोजगार तरुण घेऊन जात असे.मालमत्तेचा शोधदरम्यान, धीरज पाटील याची बँक खाती सील केल्यानंतर त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Sangliसांगलीcrimeगुन्हेpassportपासपोर्ट