मलेशियात नोकरी देण्याच्या आमिषाने गंडा दोघांवर गुन्हा दाखल, दीड लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:50 PM2017-12-06T23:50:51+5:302017-12-06T23:53:54+5:30

सांगली : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अखेर सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Malegaon blast filed in Malegaon case, two-and-a-half-year fraud | मलेशियात नोकरी देण्याच्या आमिषाने गंडा दोघांवर गुन्हा दाखल, दीड लाखाची फसवणूक

मलेशियात नोकरी देण्याच्या आमिषाने गंडा दोघांवर गुन्हा दाखल, दीड लाखाची फसवणूक

Next
ठळक मुद्दे पोलिसपुत्राचा समावेश; फसवणूक झालेला तरुण सोलापूरचा प्रत्यक्षात हॉटेलमध्ये वेटरची नोकरी

सांगली : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अखेर सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कौस्तुभ सदानंद पवार (रा. शिवराज कॉलनी, वसंतनगर, सूतगिरणी रोड, कुपवाड) व धीरज पाटील (रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या एजंटांची नावे आहेत.

मलेशिया येथे नोकरीसाठी गेलेल्या तरूणांकडे वर्किंग व्हिसा नसल्याने तेथील पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरूंगात आहेत. त्यात गुरूनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) या तरुणाचाही समावेश आहे.

गुरुनाथ याची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचे मेहुणे नामदेव लक्ष्मण कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.गुरूनाथ कुंभार याने कºहाड येथील साई सम्राट इन्स्टिट्यूटमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्यादरम्यान त्याची ओळख शिक्षक असलेल्या कौस्तुभ पवार याच्याशी झाली. त्याने १० एप्रिल रोजी गुरुनाथ याला दूरध्वनीवरून सांगली बस स्थानकासमोरील हॉटेल लक्ष्मी येथे बोलावून घेतले. ‘मी तुला मलेशियात हॉटेल मॅनेजरची नोकरी लावतो. यापूर्वी शंभर जणांना मलेशियात नोकरी लावली आहे’, असे सांगितले. ही बाब गुरुनाथने त्याचे मेहुणे नामदेव कुंभार यांना सांगितली. त्यानंतर गुरुनाथ व नामदेव यांनी कौस्तुभची भेट घेतली. तेव्हा त्याने दोन वर्षाचा व्हिसा व नोकरी लागेपर्यंत राहण्याचा खर्च अशी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्याला ४० हजार रुपये रोख दिले व इतर रक्कम बँक खात्यावर जमा केली.

पैसे मिळाल्यानंतर कौस्तुभ याने गुरुनाथसह तीन मुलांना तिरूचिरापल्ली येथून मलेशियाला पाठविले.
मलेशियात पोहोचल्यानंतर या मुलांचा १३ नोव्हेंबरपर्यंत गुरूनाथ याच्याशी संपर्क होत होता. एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम मिळाले असून, अजून वर्किंग व्हिसा मिळाला नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कौस्तुभ याच्याशी संपर्क साधला असता त्याने, मलेशियातील एजंटाशी बोलणे झाले असून गुरूनाथला त्याच्या कामाच्या ठिकाणी व्हिसा मिळेल, असे सांगितले. आम्ही वेळोवेळी कौस्तुभशी संपर्क साधून व्हिसाबाबत विचारणा केली. १३ नोव्हेंबररोजी कौस्तुभने दूरध्वनी करून, गुरूनाथ याला इमिग्रेशन कार्यालयात चौकशीला नेले आहे, त्याच्याशी दोन दिवस संपर्क करू नका, असे सांगितले. पुन्हा तीन दिवसांनी कौस्तुभने, गुरूनाथला सोडण्यास वेळ लागणार असल्याचे सांगितले.

दरम्यानच्या काळात गुरूनाथचा मलेशियातील मित्र प्रशांत बंदीचौडे याने गुरुनाथ व तिघांना पोलिसांनी वर्किंग व्हिसा नसल्याने पकडल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर आम्ही कौस्तुभशी संपर्क साधला. त्याने, गुरूनाथ व इतरांना सोडविण्यासाठी वकील दिला असून दोन दिवसात मुले मलेशियाच्या तुरूंगातून सुटतील असे सांगितले. त्यानंतर त्याने दूरध्वनी बंद केला. कºहाड येथील साई सम्राट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून कौस्तुभचा पत्ता घेऊन त्याच्या घरी गेलो. तिथेही त्याने, तुमचे पैसे परत करू, मुलांनाही परत आणू, असे आश्वासन दिले. त्याने धीरज पाटील या व्यक्तीशी दूरध्वनीवरून बोलणेही करून दिले. पाटील हा वरिष्ठ एजंट असल्याचे त्याने सांगितले. पण अद्याप त्याने पैसेही परत केले नाहीत, की मुलांनाही मलेशियातून सोडवून आणलेले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलिसांनी कौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी तीन मुलांची फसवणूक
गुरुनाथ याच्यासह आणखी तीन मुलांची कौस्तुभ व धीरज या दोघांनी फसवणूक केली आहे. मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. गुरुनाथसह हे तिघेही मलेशियाच्या तुरूंगात आहेत. त्यांना वर्किंग व्हिसा न देता टुरिस्ट व्हिसावर मलेशियात पाठविण्यात आले. टुरिस्ट व्हिसा संपल्यानंतर मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे.
वेटरची नोकरी दिली
मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो, म्हणून कौस्तुभ व त्याच्या साथीदाराने तरुणाकडून दीड लाख रुपये घेतले. मलेशियात जाण्यासाठी विमान प्रवास, दोन वर्षाचा व्हिसा व नोकरी मिळेपर्यंत राहण्याचा खर्च करण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून गुरूनाथ याने दीड लाख रुपये कौस्तुभला दिले. मलेशियात हॉटेल मॅनेजरची नोकरी लावू, असे सांगितले. पण प्रत्यक्षात हॉटेलमध्ये वेटरची नोकरी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

 

Web Title: Malegaon blast filed in Malegaon case, two-and-a-half-year fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.