शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात पाण्यासाठी धावाधाव

By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST

गलथान कारभार : ऐन पावसाळ््यात सांगली, कुपवाडमध्ये पाणीटंचाई

सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सांगली व कुपवाडमधील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. यंत्रणा पूर्ववत केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी शनिवारीही पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले. ऐन पावसाळ््यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे. सांगली व कुपवाड या दोन शहरांना गुरुवारी मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने शुद्ध आणि शंभर टक्के फिल्टर झालेले पाणी देण्यासाठी गाळप होऊ शकेल इतकाच पुरवठा करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्यावर झाला. शहरात दैनंदिन पुरवठ्यापेक्षा कित्येक पटीने कमी पाण्याचा पुरवठा झाला. माळबंगला येथून पुरवठा होणाऱ्या कुपवाड, अभयनगर, यशवंतनगर, विश्रामबागसह उपनगरांत शुक्रवारी तासभरच पाण्याचा पुरवठा झाला. हा पुरवठाही शुद्ध नव्हता. शनिवारीही सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दुसऱ्या बाजूला पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनीही शनिवारी दुपारी बंद होते. त्यामुळे तक्रार करण्यासही नागरिकांना अडचणी आल्या. (प्रतिनिधी)