शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल डेपो, फटाके विक्रेत्यांकडूनही नियमदहन

By admin | Updated: August 10, 2015 00:54 IST

उत्पन्नावर पाणी : अंतिम परवाने न घेताच नियमबाह्य कारभार, अग्निशमन विभागाचेही दुर्लक्ष--खेळ आगीशी खेळ जिवाशी-२

अविनाश कोळी- सांगली -ज्वलनशील पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी महापालिकेच्या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षण अधिनियमाच्या चिंधड्या उडविल्या आहेत. महापालिका शहरातील रॉकेल डेपो, फटाके विक्रेते, गॅस पंप, सॉ मिल तसेच हॉटेल व्यावसायिकांनी नियमदहन करून अंतिम परवान्यासाठी, त्याच्या नूतनीकरणासाठी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडून महापालिकेलाही या व्यावसायिकांसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ज्वलनशील पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या संस्था, विक्रेते यांनी आगप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनांचे पालन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. घरगुती व व्यावसायिक गॅसचे वितरक, रॉकेल डेपो, गॅस पंप, फटाके विक्रेते यांची यादी महापालिकेकडे आहे. यादी असूनही नियमांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेकडून कोणतेही ठोस प्रयत्न होत नाहीत. दुसरीकडे लोकांच्या व स्वत:च्या जिवाशीही खेळ करीत अशा व्यावसायिकांनी नियमदहनाचा बाजार मांडला आहे. स्फोटक पदार्थांच्या ठिकाणी या अधिनियमानुसार सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेकांनी आगप्रतिबंधक उपाययोजनाच केल्या नाहीत. काहींनी उपाययोजनेसाठीचा प्राथमिक परवाना घेतला आहे. काहींनी अंतिम परवाना घेऊन त्याचे नूतनीकरण केले नाही. म्हणजेच सर्वत्र बेफिकीरी दिसून येत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज, परमिट रूम, बिअरबार, बिअरशॉपी, ५ अश्वशक्तीच्यावरील उद्योग, व्यावसायिक, टिंबर मार्ट, सॉ मिल्स्, फर्निचर शोरूम, केमिकल व ज्वलनशील पदार्थ विक्रीची दुकाने व गोदामे यांनीही आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. मोजक्याच लोकांनी अंतिम परवाने व नूतनीकरण केल्याचे दिसत आहे. सॉ मिलकडून नकारघंटामहापालिका क्षेत्रातील २0 सॉ मिल, टिंबर मर्चंट व्यावसायिकांनी २00८ पासून आजअखेर नूतनीकरण करून घेतलेले नाही. आवश्यक ती फीसुद्धा त्यांनी भरलेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागानेच ही माहिती दिली आहे. तरीही कारवाईच्या बाबतीत महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. सॉ मिलकडून नकारघंटामहापालिका क्षेत्रातील २0 सॉ मिल, टिंबर मर्चंट व्यावसायिकांनी २00८ पासून आजअखेर नूतनीकरण करून घेतलेले नाही. आवश्यक ती फीसुद्धा त्यांनी भरलेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागानेच ही माहिती दिली आहे. तरीही कारवाईच्या बाबतीत महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. महापालिका क्षेत्रात केमिकल व ज्वलनशील पदार्थांच्या विक्रीची दुकाने, त्यांची गोदामे, फर्निचरची दुकाने, दुचाकी व चारचाकीची शोरूम्स्, पाच अश्वशक्तीवरील उद्योग यांची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संस्थांना, कारखान्यांना नोटिसा देण्याचाही संबंध उरलेला नाही. महापालिकेच्या या निष्काळजीपणाने संकटाला निमंत्रण देण्याचे काम केले आहे.