Road blocked for internet range only: Block the way of traders in Shirala taluka | इंटरनेट रेंजसाठीच रस्ता केला जाम : शिराळा तालुक्यातील व्यापाऱ्यांचा रास्ता रोको

इंटरनेट रेंजसाठीच रस्ता केला जाम : शिराळा तालुक्यातील व्यापाऱ्यांचा रास्ता रोको

ठळक मुद्देइंटरनेट रेंजसाठीच रस्ता केला जाम शिराळा तालुक्यातील व्यापाऱ्यांचा रास्ता रोको

कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील इंटरनेट सुविधा गेल्या दोन महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याच्या कारणावरुन शेडगेवाडी येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.

परिसरात सर्व कंपनींचे स्वतःचे मोबाइल टॉवर असूनही रेंज येत नाही. यामुळे खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत होत नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

कसलाही संपर्क होत नसल्याने व्यापाऱ्यांना दुकान सोडून ऊंच ठिकाणी जाऊन फोन लावावे लागत होते. याच बरोबर शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास, शासकीय कामे, बँकेची कामे रखडत असल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजता मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, दिनकर शेडगे, तानाजी नाठुलकर,विकास शेडगे, संजय कोठावळे,बाबा गोळे आदींसह व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Road blocked for internet range only: Block the way of traders in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.