शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत 'महिलाराज', दिग्गजांना धक्का; कुणाचा पत्ता कट, कुणाला मिळणार संधी.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:02 IST

मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा : ६१ गटांपैकी सात अनुसूचित जाती, १६ ओबीसी, ३८ सर्वसाधारण

सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये सात गट अनुसूचित जाती, १६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण ३८ गट आरक्षित झाले. ६१ पैकी ३१ गट महिलांसाठी आरक्षित झाले असून, यामध्ये अनेक दिग्गजांना धक्के बसले, तर दुसरीकडे काही इच्छुकांचा मिनी मंत्रालयात जाण्याचा रस्ता मोकळा झाल्याने उत्साह दिसून आला. या आरक्षणात बरेच बदल झाल्याने अनेक दिग्गजांना दुसरे मतदारसंघ (गट) शोधावे लागणार आहेत.आरक्षण सोडत जिल्हा नियोजन सभागृहात काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात, आदी उपस्थित होते. आरक्षण सोडत नवीन पद्धतीने काढण्यात आली. यामुळे पूर्वी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद गट पुन्हा त्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर होता.प्रशासनाने पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती, नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग, सर्वसाधारण जागांसाठीचे आरक्षण निश्चित केले. त्यानंतर महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची सोडत झाली. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, बेडग, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी आणि जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद गट सर्वाधिक लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षित केले.या आठ जिल्हा परिषद गटातून चार महिलांसाठी आरक्षण सोडत काढली. यामध्ये मिरज तालुक्यातील कवलापूर, म्हैसाळ, मालगाव आणि बेडग हे चार गट महिलांसाठी आरक्षित झाले. त्यानंतर १६ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढून आठ गट महिलांसाठी आरक्षित ठेवले. उर्वरित ३८ गट सर्वसाधारण राहिले होते त्यातील १९ जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित ठेवले....यांचा पत्ता कटजिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा म्हैसाळ गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती अरुण राजमाने, तमनगौडा रवी-पाटील, संग्रामसिंह देशमुख, प्रमोद शेंडगे, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर, आदी दिग्ग्जांचा आरक्षण सोडतीमध्ये पत्ता कट झाला....यांना संधीमाजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (कामेरी), ब्रम्हानंद पडळकर (खरसुंडी), शरद लाड (कुंडल), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), सतीश पवार (मणेराजुरी), सरदार पाटील (मुचंडी), दिनकर पाटील (भोसे), सुनील पाटील, अर्जुन पाटील (विसापूर), आदींना संधी मिळणार आहे.

हरकतींना १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतआरक्षण सोडतीबाबतच्या हरकती १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद गटाची हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांची हरकत तालुक्यात तहसील कार्यालयात द्यायची आहे.

जिल्हा परिषद गटाचे आरक्षणअनुसूचित जाती : रांजणी (ता. कवठेमहांकाळ), उमदी (ता. जत), सावळज (ता. तासगाव). महिला : म्हैसाळ (एस), मालगाव, कवलापूर, बेडगाव (ता. मिरज).नागरिकांचा मागास प्रवर्ग : मुचंडी, शेगाव (ता. जत), दिघंची (ता. आटपाडी), कुची, ढालगाव (ता. कवठेमहांकाळ), वाळवा, अंकलखोप (ता. पलूस), समडोळी (ता. मिरज). महिला : तडसर, कडेपूर, देवराष्ट्रे (ता. कडेगाव), बोरगाव, पेठ (ता. वाळवा), बिळूर (ता. जत), बुधगाव, कवठेपिरान (ता. मिरज).सर्वसाधारण : दरिबडची, बनाळी (ता. जत), भोसे, कसबे डिग्रज (ता. मिरज), करगणी, खरसुंडी (ता. आटपाडी), विसापूर, मणेराजुरी, येळावी, चिंचणी, मांजर्डे (ता. तासगाव), कोकरुड, मांगले (ता. शिराळा), कुंडल, भिलवडी (ता. पलूस), बावची, भाळवणी, कामेरी, चिकुर्डे (ता. वाळवा). महिला : कासेगाव, वाटेगाव, बागणी, रेठरे हरणाक्ष, येलूर (ता. वाळवा), पणुंब्रेतर्फे वारुण, वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा), डफळापूर, संख, जाडरबोबलाद (ता. जत), एरंडोली, आरग (ता. मिरज), वांगी (ता. कडेगाव), नागनाथनगर नागेवाडी, करंजे, लेंगरे (ता. खानापूर), निंबवडे (ता. आटपाडी), देशिंग (ता. कवठेमहांकाळ), दुधोंडी (ता. पलूस).

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad: Women Dominate, Veterans Sidelined in Reservation Draw

Web Summary : Sangli Zilla Parishad's reservation draw favors women, reserving 31 of 61 seats. Many veterans face setbacks as new opportunities arise for others. Objections are open until October 17.