शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री ‘महसूल’ची हप्ते वसुली जोरात

By admin | Updated: September 1, 2015 22:29 IST

वाळवा तालुक्यातील चित्र : वाळू ठेकेदारांची लूट

अशोक पाटील - इस्लामपूर  वाळवा तालुक्याचा महसूल विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. आता नवीन आलेल्या निवासी नायब तहसीलदार आणि वाहनचालकाने नवीनच प्रताप सुरू केले आहेत. मध्यरात्री महामार्गावरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून ते हजारो रुपयांची हप्ते वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत शिये (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील वाळू वाहतूकदार कृष्णात धोंडिराम वरुटे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीनंतर प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी स्वत:च्या अखत्यारीत ट्रक सोडून दिला आहे.याबाबत कृष्णात वरुटे यांनी अर्जात म्हटले आहे की, ३१ आॅगस्टरोजी मी ट्रकमधून (क्र. एमएच ११ एएल १२४) कऱ्हाड तालुक्यातून वाळू घेऊन कोल्हापूरकडे निघालो होतो. रात्री बाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येलूर (ता. वाळवा) गावच्या हद्दीत निवासी नायब तहसीलदार विपीन लोकरे व वाहन चालक वैभव चमकले या दोघांनी माझी गाडी अडविली. यावेळी दोघांनी माझ्याकडे ७0 हजार रुपयांची मागणी केली. माझ्याकडे पैसे नसल्याने दुसऱ्याकडून उसने घेऊन मी दहा हजार रुपये दोघांना दिले. त्यावेळी माझी गाडी सोडण्यात आली. परंतु पुन्हा माझ्या गाडीचा पाठलाग सुरू केला. शिये येथे ट्रकला गाठले. यावेळी पुन्हा निवासी नायब तहसीलदार लोकरे यांनी कारवाईची धमकी देत पैशाची मागणी केली. पैसे नाहीत असे सांगताच, ट्रकसोबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात आणले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर लोकरे यांनी खोटा गुन्हा दाखल करुन १४ वर्षे खडी फोडण्यास पाठवतो, असा दमही दिला.इस्लामपूर पोलीस ठाण्यात आल्यावर लोकरे यांनी, माझ्या अंगावर गाडी घातलीस, सोन्याची चेन, अंगठी काढून घेतलीस, असे खोटे आरोप करून इस्लामपूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु शहानिशा केल्यानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत ठरवू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. दरम्यान, रात्री लोकरे यांनी १२ ते १५ जणांना अडवून प्रत्येकी २0 ते २५ हजार रुपये घेतल्याचे वरुटे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. तक्रारीनंतर प्रांताधिकारी देशमुख यांनी ट्रक सोडून दिला.याबाबत प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या तक्रारीची दखल घेऊ. लोकरे व वाहनचालक चमकले सांगली येथे कामानिमित्त गेले आहेत. बुधवारी दोघांची चौकशी करू. यामध्ये ते दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करू.कारवाईवेळी पोलीस असणे गरजेचेज्यावेळी महसूल खात्याला कोणतीही कारवाई करायची असेल, तेव्हा पोलिसांना सोबत घेणे गरजेचे आहे. परंतु लोकरे यांनी आम्हाला काहीही न कळवताच राष्ट्रीय महामार्गावर जाऊन वाळू वाहनांवर कारवाई केली. याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नाही, अशी माहिती इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.