चांदोलीत दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन; पर्यटकांचा आनंद गगनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:41 IST2026-03-11T17:41:31+5:302026-03-11T17:41:52+5:30

चांदोलीतील पर्यटनाबाबत उत्सुकता अधिक वाढली

Rare black leopard spotted in Chandoli | चांदोलीत दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन; पर्यटकांचा आनंद गगनात

चांदोलीत दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन; पर्यटकांचा आनंद गगनात

आनंदा सुतार

वारणावती : सह्याद्रीच्या निसर्गसमृद्ध परिसरातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रविवारी सकाळच्या सफारीदरम्यान जंगलातील एका मार्गावर अचानक काळसर रंगाचा बिबट्या काही क्षणांसाठी दिसला. या अनपेक्षित दर्शनामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक पर्यटकांनी मोबाईलमध्ये त्याचे व्हिडीओ व छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला. 

वन्यजीव अभ्यासकांच्या मते काळसर बिबट्या (ब्लॅक पँथर) हा बिबट्याचाच एक प्रकार असून त्याचे दर्शन क्वचितच घडते. त्यामुळे चांदोली परिसरात असे दर्शन होणे ही वन्यजीव प्रेमींसाठी विशेष बाब मानली जाते.

सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या चांदोली परिसरात वन्यजीवांची संख्या वाढत असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. दरम्यान, या दुर्मीळ दर्शनामुळे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून चांदोलीतील पर्यटनाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Web Title : चांदोली में दुर्लभ काला तेंदुआ दिखा, पर्यटक हुए रोमांचित

Web Summary : चांदोली राष्ट्रीय उद्यान में सफारी के दौरान पर्यटकों को एक दुर्लभ काला तेंदुआ दिखाई दिया। इस दुर्लभ दृश्य ने सह्याद्री बाघ अभयारण्य में वन्यजीवों की बढ़ती आबादी को उजागर किया, जिससे वन्यजीव उत्साही रोमांचित हैं और क्षेत्र में पर्यटन को बढ़ावा मिल रहा है।

Web Title : Rare Black Panther Sighted in Chandoli, Tourists Thrilled

Web Summary : Tourists in Chandoli National Park were overjoyed to spot a rare black panther during a safari. This rare sighting highlights the increasing wildlife population in the Sahyadri Tiger Reserve, thrilling wildlife enthusiasts and boosting tourism in the area.