अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धमकी देऊन तीन लाख रुपये उकळले; शिराळ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 16:05 IST2022-05-26T16:04:11+5:302022-05-26T16:05:15+5:30

प्रेमसंबंध घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन पीडित मुलीवर बलात्कार केला. वेळोवेळी तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले. प्रेमसंबंध घरी सांगितलेस तर भावाला ठार मारण्याची धमकी दिली.

Rape of a minor girl in Shirala taluka, He took Rs 3 lakh by threatening | अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धमकी देऊन तीन लाख रुपये उकळले; शिराळ्यातील घटना

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, धमकी देऊन तीन लाख रुपये उकळले; शिराळ्यातील घटना

शिराळा : शिराळा तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार करून वारंवार धमकी देऊन तीन लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गणेश लक्ष्मण महापुरे (वय २२, रा. सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) व राजू गुंडा वारे (३४, रा. नाटोली) यांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे. गणेश महापुरे याने तिला वर्षभरापूर्वी फूस लावली. त्यानंतर जोतिबा (जि. कोल्हापूर) मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या लॉजवर तसेच राजू वारे याने सागाव येथील दुर्गामातेच्या मंदिराजवळ जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. महापुरेबरोबर असणारे प्रेमसंबंध घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन पीडित मुलीवर राजू वारे यानेही बलात्कार केला. दोघे तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी करत. वेळोवेळी तिच्याकडून तीन लाख रुपये उकळले. प्रेमसंबंध घरी सांगितलेस तर भावाला ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक, बलात्कार, खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना त्यांच्या घरातून पहाटे चारच्या दरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, दीपक हांडे, विनोद पाटील, बाबुराव पाटील, महेश साळुंखे, गणेश झंझारे यांच्या पथकाने अटक केली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Rape of a minor girl in Shirala taluka, He took Rs 3 lakh by threatening