सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:24 PM2024-03-14T17:24:34+5:302024-03-14T17:30:29+5:30

सदानंद औंधे मिरज : राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी ...

Rani Chennamma Express is the first express to depart from Sangli station | सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

सदानंद औंधे

मिरज : राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे. परळी-मिरज डेमूसुद्धा सांगलीतून धावण्यास सुरुवात झाल्याने सांगलीतील प्रवाशांची सोय झाली आहे.

गेली २५ वर्षे मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकाची निर्मिती झाल्यापासून प्रथमच या स्थानकातून एखादी एक्स्प्रेस धावणार आहे. सांगली स्थानकातून आतापर्यंत केवळ पॅसेंजर गाड्या सुटत होत्या. सांगलीजवळ दहा किलाेमीटर अंतरावर मिरज जंक्शन असल्याने सर्व एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येतात. मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मासह इतर काही एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरात नेण्यात आल्या. मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली स्थानकातून एकही एक्स्प्रेस सोडण्यात आली नव्हती. 

आता राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्याने सांगली स्थानकालाही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात जागा मिळाली आहे. नवीन बदलानुसार बंगळुरूतून सुटणारी गाडी क्र. १६५८९ बेंगळुरू-सांगली राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस बंगळुरूहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता मिरजेला पोहोचून १२:३० वाजता सुटेल व दुपारी सांगलीला १२:५० वाजता सांगलीत पोहोचणार आहे. मंगळवार, १२ मार्चपासून ही गाडी सांगलीपर्यंत सुरू झाली आहे.

बुधवार, १३ मार्चपासून सांगलीहून सुटणारी गाडी क्र. १६५९० सांगली-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस सांगलीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. ही एक्स्प्रेस सांगलीतून दुपारी ३ वाजता सुटेल. मिरजेत दुपारी ३:१५ वाजता पोहोचून ३:३५ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२० वाजता बंगळुरूला पोहोचेल. १३ मार्चपासून परळीतून सुटणारी गाडी क्र. ११४११ परळी-सांगली डेमू परळी येथून सकाळी ८:१५ वाजता सुटेल. मिरजला सायंकाळी ६:२० वाजता मिरजेत पोहोचून ६:३० वाजता सुटेल व ६:५० वाजता सांगलीत पोहोचेल.

याशिवाय १३ मार्चपासून सांगलीतून सुटणारी गाडी क्र. ११४१२ सांगली-परळी डेमू सांगलीहून रात्री ८:३५ वाजता सुटून ८:५० वाजता मिरजला पोहोचून रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ वाजता परळीला पोहोचेल. 

Web Title: Rani Chennamma Express is the first express to depart from Sangli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.