शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:31 IST

त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.

सांगली : ईडी (सक्तवसुली संचनालय), आयकर यांच्या दबावामुळे राज ठाकरे महागाईवर, केंद्र सरकारवर काहीही बोलत नाहीत. त्यांनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून दिली जाते, अशी टीका जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले की, देशातील परिस्थितीवर बोलताना महागाईवर बोलले पाहिजे. पेट्रोलचे दर सव्वाशेपर्यंत गेले, स्टील, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. तरीही राज ठाकरे याविषयी ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. त्यांच्यावर ईडी किंवा आयकर विभागाचा दबाव आहे. भाजपशी त्यांची युती झालेली नाही, काही चर्चासुद्धा झालेली नाही. तरीही ते भाजपला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या बोलत आहेत.त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज ठाकरे बोलले तर लोक त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.राज ठाकरे म्हणजे करमणुकीचे साधन आहेत. लोक दोन ते तीन तास त्यांना ऐकतात मनोरंजन समजून सोडून देतात. त्यांना हिंदुच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त मतांचे राजकारण करु पहात आहेत. लोक त्यांना थारा देणार नाहीत.

राज ठाकरे व ओवेसी यांचा डाव

एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात व हिंदुच्या बाजुंनी राज ठाकरे यांनी बोलायचे आणि त्याला विरोध म्हणून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची बाजू मांडायची असे ठरलेले आहे. धार्मिक मतांच्या ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. लोकांनी तो ओळखला आहे. त्यामुळे यांनी कितीही सभा घेतल्या तरी लोक त्यांची दखल घेणार नाहीत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRaj Thackerayराज ठाकरेJayant Patilजयंत पाटीलMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस