पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ निवडणूक : शनिवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:07 IST2019-10-04T15:04:47+5:302019-10-04T15:07:39+5:30
पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. 5 आक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ निवडणूक : शनिवारी बैठक
पुणे : पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. 5 आक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तक्रार नोंदवा
सांगली : विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणुका भयमुक्त व पादरर्शक वातावरणात पार पाडण्याकरिता तसेच जिल्हास्तरावर अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक होत असल्यास नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133, टोल फ्री क्र. 18008333333 तसेच 0233-2670876 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याने अशा स्वरूपाच्या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तसेच ठिकाणांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी या सेवेचा वापर करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयाचे उप-अधीक्षक विश्वजीत देशमुख यांनी केले आहे.