शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांकडून आश्वासनांचा पाऊस

By admin | Updated: December 28, 2016 00:37 IST

ड्रेनेजबाबत मार्चपर्यंतची हमी : महापालिकेत कामांसाठी बैठक

सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील मुख्य वाहिन्यांच्या कामांसह आॅक्सिडेशन पाँड व पंपगृहाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याची हमी देत ठेकेदार एसएमसी कंपनीने मंगळवारी महापालिकेतील बैठकीत आश्वासनांचा पाऊस पाडला. ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा व मुदतवाढी न देण्यासाठी नगरसेवकांनी आग्रह धरला होता. पण प्रशासनाने याबाबत लवचिक भूमिका घेत ठेकेदाराला शेवटची संधी दिली आहे. गेली चार वर्षे २०० कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचे काम रडतखडत सुरू आहे. मुख्य वाहिन्यांऐवजी पोटवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. आॅक्सिडेशन पाँडचे काम रखडले आहे. सांगली व मिरज या दोन्ही शहरात ड्रेनेज योजनेच्या कामावरून नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. गेल्या आठवड्यात आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी नगरसेवक व ठेकेदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. यावेळी सबठेकेदारांनी कामाबाबत हमी देण्यास नकार दिला होता. अखेर मंगळवारी मूळ ठेकेदार एसएमसी कंपनीचे संचालक प्रशांत महागावकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संगीता हारगे, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, प्रभाग दोनच्या सभापती मृणाल पाटील, नगरसेवक राजू गवळी, बाळू गोंधळी, संगीता खोत, वंदना कदम यांच्यासह सबठेकेदार सुहास जोशी, नवले, सुधीर सांगावे उपस्थित होते. शामरावनगर येथील मुख्य वाहिनीचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यासाठी चार दिवसात वाढीव कामगार देण्याची हमी ठेकेदाराने दिली. हे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत संपविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शामरावनगरमधील संपूर्ण काम संपल्याशिवाय ठेकेदाराला बिल न देण्याचा निर्णयही घेण्यात आला. धामणी रस्त्यावरील कामाला बुधवारपासून सुरूवात होत आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. खोकले मळा, प्रगती कॉलनीतील काम नागरिकांच्या सहमतीनंतर दुसऱ्या दिवशी सुरू करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली. सांगलीवाडीतील काम पंपगृहाच्या जागेमुळे अडले आहे. जीवन प्राधिकरण त्याचा सर्व्हे करून दोन दिवसात अहवाल देईल. शेरीनाला मुख्य वाहिन्यांचे काम १० जानेवारीनंतर सुरू करून ते तीन महिन्यात संपविण्यात येईल. अंकली, कोल्हापूर रोड व पद्माळे येथील पंपगृहाच्या जागेबाबतही यावेळी चर्चा झाली. हनुमाननगर येथील आॅक्सिडेशन पाँडचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठेकेदाराने दिली. दरम्यान, ठेकेदार आश्वासन पाळणार का?, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्च २०१७ पर्यंत ड्रेनेज योजनेचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली. (प्रतिनिधी)महापालिका घेणार : वाळू ठेकाड्रेनेज योजनेच्या कामासाठी वाळूची गरज आहे. सध्या वाळू नसल्याने बांधकामाचे काम थांबल्याची तक्रार ठेकेदाराने गत बैठकीत केली होती. त्यावर आयुक्तांनी वाळू ठेका घेण्याचाच मार्ग काढला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली असून, वाळू लिलावात महापालिका एका जागेचा ठेका घेईल. त्यातील वाळू बांधकामासाठी वापरावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. माजी महापौरांचा विरोधमिरजेतील शास्त्री चौकात ड्रेनेज लाईनसाठी चाचणी घेतली जाणार आहे. पण त्याला माजी महापौर विवेक कांबळे यांनी विरोध केला आहे. त्यांच्याच प्रभागात तीन ठिकाणी चाचणी होणार आहे. माजी महापौरांनी काम करण्यास मज्जाव केल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले. त्यावर राजू गवळी यांनी, माजी महापौरांची भेट घ्या, असा टोला लगावताच बैठकीत हशा पिकला.