शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शंभर एकर द्राक्षबागांवर किडींचा प्रादुर्भाव

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

ढगाळ हवामानाचा परिणाम : दावण्याच्या फैलावामुळे शेतकरी चिंतेत

दरीबडची : ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, धुके, दव यामुळे जत पूर्व भागातील द्राक्षबागांवर दावण्या, स्ट्रिप्स आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे दावण्याच्या प्रभावाने फ्लॉवरिंगमध्ये असलेल्या बागांचे मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे यासारख्या गंभीर समस्यांना बागांना सामोरे जावे लागत आहे. मुचंडी, सिध्दनाथ परिसरातील १०० एकर बागांवर परिणाम झाला आहे. पावसामुळे द्राक्षबागांच्या औषधांचा खर्च दुप्पट झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.पूर्व भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर छाटणी घेतलेल्या बागांना दीपावलीवेळी पडलेल्या रिमझिम पावसाचा मोठा फटका बसला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २४ ते २७ आॅक्टोबरपर्यंत रिमझिम पाऊस व ढगाळ हवामानामुळे बागांवर परिणाम झाला आहे. सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, मुचंडी, शेड्याळ, आसंगी तुर्क, संख, भिवर्गी, तिकोंडी भागातील ज्यांच्या बागा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये होत्या, अशा बागांवर परिणाम झाला आहे.औषध फवारणी करण्यासाठी दोन दिवस वेळ दिला नाही. सारख्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. औषध फवारणी करता आली नाही. द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे आदी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. द्राक्षघडांची वाढ खुंटली आहे. घड विरघळले आहेत. द्राक्षघड कमी झाले आहेत. याचा मोठा फटका बसला आहे. दावण्या रोखण्यासाठी त्यावेळी दिवसातून एक-दोनवेळा औषध फवारणी केली आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ आणि द्राक्षोत्पादक घायाळ, असे चित्र निर्माण झाले आहे.दावण्या रोगाचा प्रादुर्भाव घडांवर व डोळ्याच्या ठिकाणी दिसून येऊ लागला आहे. द्राक्षबागांवरील दावण्या, भुरी, स्ट्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी द्राक्षबागायतदारांनी औषध खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली आहे. बागांवर महागड्या औषधांच्या फवारणीचा सपाटा सुरू केला आहे. अ‍ॅक्रोबॅट अलेट, मिलेडो कर्जटकोसाईट ही औषधे फवारली जात आहेत. (वार्ताहर)रिमझिम पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटांमुळे मणी गळाल्यामुळे घडांची संख्या कमी झाली आहे. वाढही खुंटली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे. याचा मोठा फटका बसणार आहे.- मारुती पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी