Sangli-Local Body Election: शिराळ्यातील महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक सर्वांत 'श्रीमंत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:48 IST2025-12-05T17:45:10+5:302025-12-05T17:48:34+5:30
निखिल कांबळे सर्वात ‘गरीब’ उमेदवार !, आर्थिकदृष्ट्या उमेदवारांमध्ये प्रचंड विषमता

Sangli-Local Body Election: शिराळ्यातील महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक सर्वांत 'श्रीमंत'
विकास शहा
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या आठ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची माहिती समोर आली असून, आर्थिकदृष्ट्या उमेदवारांमध्ये प्रचंड विषमता असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुण उमेदवार पृथ्वीसिंग नाईक (वय २९) हे या स्पर्धेत सर्वांत श्रीमंत तर नोकरी करणारे निखिल कांबळे (वय ३३) हे सर्वांत कमी मालमत्ता असलेले उमेदवार ठरले आहेत.
पृथ्वीसिंग नाईक यांची एकूण मालमत्ता तब्बल १ कोटी २४ लाख रुपये आहे. त्यांच्या नावावर ५८.६९ लाखांची महागडी गाडी, ७७.५३ लाखांचे जंगम दागिने, तर ४६ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. वार्षिक उत्पन्न ७.७५ लाख असून, त्यांच्यावर १८.८७ लाखांचे कर्ज आहे. रिंगणात ते सर्वाधिक संपन्न उमेदवार ठरले आहेत.
वाचा : आष्टा नगरपरिषदेसाठी कोट्यधीश उमेदवारांची गर्दी, सर्वात श्रीमंत कोण...
नोकरी करणारे निखिल कांबळे यांची मालमत्ता केवळ ३.०६ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे १.७० लाखाचे वाहन, ४५ हजारांचे वार्षिक उत्पन्न आणि विशेष म्हणजे कुठलाही कर्जाचा बोजा नाही. दागिने फक्त १.२ लाखाचे आहेत.
वाचा : आटपाडीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक उमेदवार कोट्यधीश, बाकी लक्षाधीश
प्रदीप जोशी (वय ६७) यांच्याकडे तब्बल ३९.३५ लाखांचे दागिने असून, त्यांच्या एकूण मालमत्तेची रक्कम ६०.४० लाख आहे. वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये, तर २४ हजारांचे देणे आहे. विशेष म्हणजे, पृथ्वीसिंग नाईक यांच्या पत्नीच्या नावावर तसेच निखिल कांबळे यांच्या स्वतःच्या नावावर कुठलेही दागिने नाहीत. शिराळा नगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवारांची आर्थिक ताकद व परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे हे प्रतिज्ञापत्र स्पष्ट चित्र दाखवते.
वाचा : विट्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची मालमत्ता किती, सर्वात श्रीमंत कोण...
इतर उमेदवारांच्या मालमत्ता खालीलप्रमाणे
- वसंत कांबळे (४०) : एकूण २१.७७ लाख; उत्पन्न ४५ हजार.
- अभिजित नाईक (४७) : एकूण ७४.६४ लाख; उत्पन्न ४.५ लाख, देणे ४.३० लाख.
- श्रीराम नांगरे पाटील (३३) : एकूण २१.०७ लाख; देणे ४.२५ लाख
- मारुती रोकडे (४२) : मालमत्ता ३.२२ लाख; उत्पन्न २.७० लाख.
- सम्राट शिंदे (४८) : एकूण ७६.७० लाख; उत्पन्न ५ लाख, देणे ६० हजार.