सांगलीच्या नवरात्रोत्सवाशी बंगाली परंपरेचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 20:49 IST2019-10-07T20:47:06+5:302019-10-07T20:49:29+5:30
सांगली : सण, उत्सवांच्या शेकडो, हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक प्रांतांच्या समुहाच्या परंपरांचे मिश्रण होत असते. त्यामुळे अनेक सण, परंपरांचे ...

विश्रामबाग परिसरासह अनेकठिकाणचे लोक, महिला यांनी या अनोख्या मूर्तीचे दर्शन घेतले. मूर्ती व तिची पुजापद्धती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
सांगली : सण, उत्सवांच्या शेकडो, हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक प्रांतांच्या समुहाच्या परंपरांचे मिश्रण होत असते. त्यामुळे अनेक सण, परंपरांचे रुपडेही बदलताना आपण पहात असतो. काही परंपरा बदलत नसल्या तरी आधुनिक काळात त्याचे स्वरुप बदलते. सांगलीला नवरात्रोत्सवाची मोठी परंपरा असली तरी या परंपरेच्या प्रवाहाला बंगाली परंपरा जोडण्याचे अनोखे काम सांगलीतील एका कुटुंबाने केले आहे.
सांगलीच्या विश्रामबाग रेल्वे गेट कॉलनीतील अक्षयसिंह चौहान यांनी कोलकत्ता येथून यावर्षी महाकाली दुर्गामातेची मूर्ती मागविली होती. यामध्ये महाकालीबरोबरच सरस्वती, गणपती, कार्तिक अशा तिच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश आहे. अत्यंत सुबक व सुंदर मूर्तीने यंदाच्या त्यांच्या उत्सवाला वेगळाच रंग भरला. हे एक चलचित्र भासते. या मूर्तीच्या पुजेचा ढाचाही बंगाली आहे. घटस्थापनेला प्रतिष्ठापना करण्यात आली असली तरी बंगाली परंपरेप्रमाणे पंचमी ते दशमी असे पाच दिवस पुजा याठिकाणी पार पडली. १0८ बेलपत्री, कमलपुष्पाने तिची पुजा करण्यात आली.