शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेवर ‘आयकर’चा छापा

By admin | Updated: December 27, 2016 00:56 IST

दिवसभर तपासणी : २३ शाखा रडारवर; नोटाबंदीनंतरच्या संशयास्पद खात्यांची चौकशी

सांगली : नोटाबंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या २३ शाखांची तपासणी आयकर विभागामार्फत सुरू झाल्याचे समजते.आयकर विभागाच्या सात अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. त्यांनी अचानक बँकेशी संबंधित नसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांना तातडीने सर्व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीला सुरुवात झाल्यानंतर बँकेभोवती पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्यांना अटकाव केला जात होता. दिवसभर या पथकाने तपासणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या पंधरा दिवसात नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह १६ शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण १९ शाखा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी एक लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एककनेही (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मागविली आहे. २0 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला आहे. नाबार्डने १० डिसेंबर रोजी ज्यावेळी जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेतून जुन्या नोटांबाबतची माहिती घेतली, त्यावेळी १९ शाखांमधील जमा झालेल्या रकमा प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्या. या एकोणीस शाखांपैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या सहा शाखांची तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात झाली होती. (प्रतिनिधी)जुन्या नोटांबाबतच चौकशीजुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने तीन दिवस चालविली. याच कालावधित मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याचा संशय नाबार्डने व्यक्त केला होता. जिल्हा बँक अध्यक्षांनी, असे कोणतेही संशयास्पद व्यवहार बँकेत झाले नसल्याचे सांगितले होते. तरीही नाबार्ड आणि वित्तीय आसूचना कार्यालयाने बँकेच्या खात्यांची तपासणी केली.मोबाईल बंदअधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल दुपारपासून बंद होते. बँकेचा मुख्य दरवाजा वगळता बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. बँकेत दुपारपासून कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे दिवसभर बँकेच्या आवारात स्मशानशांतता दिसत होती. रात्री उशिरापर्यंत खात्यांच्या तपासणीचे काम सुरू होते. तीन दिवसांत ३०० कोटी१0 नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधित एक दिवसाच्या बंदचा अपवाद वगळता, तीन दिवस जुन्या नोटा सांगली जिल्हा बँकेने स्वीकारल्या. या तीन दिवसांत बँकेकडे ३00 कोटी ५ लाख १६ हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले होते. यामध्ये १ लाख ३ हजार ८0४ व्यक्तिगत खातेदारांनी २0८ कोटी ७१ लाख १५ हजार रुपये, व्यक्तिगत कर्जदारांनी ३१ कोटी ६६ लाख ३४ हजार रुपये, तर संस्थांकडून ५९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपये जमा केले आहेत.