शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत विसर्जन मिरवणुकांची तयारी पूर्ण

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

मोठा बंदोबस्त : १८५ सार्वजनिक मंडळांच्या गणरायांना रविवारी निरोप, स्वागत कमानी सजल्या

मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला रविवार, दि. २७ रोजी सुरुवात होणार आहे. सुमारे १८५ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे सवाद्य मिरणुकीने विसर्जन होणार आहे. यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी प्रमुख मार्गावरून संचलन केले. मोठ्या मूर्तींची स्थापना केलेल्या ४५ मंडळांच्या गणेश मूर्तींचे कृष्णाघाटावर व १४० मंडळांच्या गणेश मूर्तींचे गणेश तलावात विसर्जन करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर दुतर्फा विविध पक्ष व संघटनांनी उभारलेल्या स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत आहेत. डॉल्बीवर प्रतिबंध असल्याने बँड, बेंजो, झांज, ढोल, लेझीम व पारंपरिक वाद्यांचा वापर रात्री १२ वाजेपर्यंत करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. वाद्यांच्या ध्वनी मापनासाठी पोलिसांची ३ पथके नियुक्त केली आहेत. कृष्णा घाट व गणेश तलाव येथे महापालिकेतर्फे यांत्रिक बोट, तराफा, क्रेन व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या मूर्तींचे कृष्णाघाटावर क्रेनव्दारे नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांच्यासह बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा मिरजेत पाचारण करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी मिरवणूक मार्गावर गणेश तलाव ते पोलीस ठाण्यापर्यंत ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पंधरा फिरत्या कॅमेऱ्यांव्दारे मिरवणुकीवर पोलिसांची नजर ठेवण्यात येणार आहे. महिला छेडछाड विरोधी, मद्यपी वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी, दंगल नियंत्रक अशी साध्या वेशातील पथके मिरवणुकीत कार्यरत असणार आहेत. विसर्जनासाठी वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. मंडळांनी मिरवणुकीसाठी सजीव देखावे व आकर्षक सजावट केली आहे. मिरवणूक मार्गावर विश्वशांती मंडळ, मनसे, मराठा महासंघ, शिवसेना, हिंदू एकता, एकता मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी मंडळांसह विविध मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. महापालिका, जनसुराज्य शक्ती, रिपाइं, शिवसेनेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. मिरवणुकीवर उंच मनोऱ्यातून व इमारतींवरून शस्त्रधारी पोलीस लक्ष ठेवणार आहेत. मिरवणूक रेंगाळत ठेवून उशिरा विसर्जन करणाऱ्या मंडळांवर व मद्यपान करून शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर रात्रीच्या अंधारातील चित्रण होणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. (प्रतिनिधी) पोलीस मदत केंद्र विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांना मिरवणूक मार्गावर प्रतिबंध करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील दुय्यम रस्ते, बोळ बंद करण्यात आले आहेत. प्रमुख सात चौक व मिरवणूक मार्गावरील उंच इमारतींवर शस्त्रधारी पोलीस व कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीतील गर्दीत हरवलेल्या, सापडलेल्या लहान बालके व व्यक्तींसाठी पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. रविवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तास सुरुवात होत असून, सोमवारी सकाळपर्यंत २४ तास मिरवणूक सुरू राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नवव्यादिवशी पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत पोलिसांचा प्रतिबंध झुगारून डॉल्बीचा वापर करणाऱ्या काही मंडळांवर पोलीस कारवाई करणार आहेत.