शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:50 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी गटासमोर भाजपचे आव्हान

सुशांत घोरपडेम्हैसाळ : नुकताच विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागले. लागलेल्या निकालाच्या आकडेवारीचा अंदाज बांधत मिरज तालुक्यातील दुसऱ्या फळीत कार्यकर्ते म्हणून काम करणारे गावपुढारी जिल्हा परिषदपंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.जिल्हा परिषद निवडणूक ही ग्रामीण भागातील गावासाठी महत्त्वाची ठरते. गावपुढाऱ्यांसाठी ते मिनी मंत्रालय असते. म्हणून सर्व पक्षातील दुसऱ्या फळीत काम करणारे अनेक पुढारी जिल्हा परिषदेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. मिरज तालुक्यातून नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार डॉ. सुरेश खाडे यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले. भाजपचे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी करत आहेत.विधानसभेचा निकालावरून मिरज तालुक्यातील मतदारांचा कौल लक्षात येतो, असे असले तरी विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या व जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका वेगळ्या असे राजकीय जाणकारांतून व्यक्त होऊ लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीच आपल्या जिल्हा परिषद गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेला ग्रामीण भागात प्रचाराची भिस्त सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आपले करण्याच्या खेळ्या सर्व पक्षाच्या वरिष्ठांकडून सुरू आहेत. यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी कामाला लागले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी गटासमोर भाजपचे आव्हानमिरज तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मानणारा मोठा गट आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समितीची निवडणूक यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. विधानसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नेटके नियोजन करत बूथ व्यवस्था हाताळली. यामुळे तानाजी सातपुते यांना ८४ हजार मतदानापर्यंत पोहोचता आले. आता महाविकास आघाडीचे नेते कशी मोठ बांधतात ? हे पाहावे लागेल !पक्षापेक्षा माणूस महत्त्वाचा !जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदार पक्षापेक्षा माणूस बघून मतदान करतो. त्यामुळे निवडणुका मोठी चुरस पहायला मिळते.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक 2024BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना