शिक्षक संघाच्या कडेगाव तालुकाध्यक्षपदी प्रदीप पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:02+5:302021-04-19T04:24:02+5:30

फोटो १८ प्रदीप पवार लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडेगाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप पवार तर कार्यकारी अध्यक्षपदी ...

Pradip Pawar as Kadegaon taluka president of Shikshak Sangh | शिक्षक संघाच्या कडेगाव तालुकाध्यक्षपदी प्रदीप पवार

शिक्षक संघाच्या कडेगाव तालुकाध्यक्षपदी प्रदीप पवार

फोटो १८ प्रदीप पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कडेगाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप पवार तर कार्यकारी अध्यक्षपदी महेश कुंभार यांची एकमताने निवड करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव तालुका शिक्षक संघाचा तालुकास्तरीय मेळावा व जिल्हा कार्यकारिणी मिटिंग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये कडेगाव तालुका शिक्षक संघाच्या कार्यकारिणीमध्ये एकमताने बदल करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक संघाचे प्रदीप पवार यांची तालुकाध्यक्षपदी तर महेश कुंभार यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तालुका महिला कार्यकारिणीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नंदाताई नानासाहेब कांबळे यांची निवड करण्यात आली.

या मेळाव्यामध्ये शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न, कोरोना काळातील बदलते ऑनलाईन शिक्षण, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, शिक्षक बँकेची येऊ घातलेली निवडणूक या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्य नेते संभाजीराव थोरात, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, पोपटराव सूर्यवंशी, तानाजी खोत, सुधाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कडेगाव तालुका शिक्षक संघाचे अशोक महिंद, धनंजय नरुले, शेळके, तुकाराम कांबळे यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pradip Pawar as Kadegaon taluka president of Shikshak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.