शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाकाठी रंगली राजकीय टोलेबाजी

By admin | Updated: November 13, 2016 23:47 IST

रुसवा-फुगवीचा खेळ : पक्षांतर्गत संघर्षातून काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली खदखद

सांगली : वसंतदादांच्या जन्मशताब्दी सोहळ्यालाही स्थानिक पक्षांतर्गत संघर्षाचा रंग लागला. भाषणांमधून एकमेकांना डिवचण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही. दुसरीकडे रुसवा-फुगवीच्या खेळातून काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही या गोष्टींची दखल घेत, भाषणातून सर्वांना सबुरीचा सल्ला द्यावा लागला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दादा व कदम गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही गटांमध्ये कुरघोड्यांचे राजकारणही रंगले आहे. विशाल पाटील गटाने बंडखोरी केल्यामुळे या निवडणुकीत कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीचे पडसाद वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ्यात उमटणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. कार्यक्रमात पतंगराव कदम म्हणाले की, वसंतदादांनी १९७१ मध्ये मला मुंबईत सरचिटणीसपद दिले. निवडीचे फलक झळकल्यानंतर ते लगेच पक्षांतर्गत संघर्षातून उतरले सुद्धा होते. अशी अनेक वादळे मी झेलली आहेत. वसंतदादांनी ज्यापद्धतीने या संघर्षाला तोंड दिले, त्याचपद्धतीने मीसुद्धा देत आहे. अन्य लोकांनीही दादांचा आदर्श घेऊन कार्यरत राहावे. छदमी राजकारण सोडून पुढे गेले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. पतंगराव कदम यांचे भाषण होण्यापूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम वसंतदादांच्या स्मारकास अभिवादन करून पुन्हा निघून गेले होते. जयश्रीताई पाटील, महापौर हारुण शिकलगार यांच्यासह मदनभाऊ गटातील नगरसेवक, कार्यकर्ते यांनी स्मारकस्थळी हजेरी लावून कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी) पतंगरावांनी सर्वांना एकत्रित करावे... या सर्व गोष्टींची दखल अशोक चव्हाण यांना घ्यावी लागली. कार्यक्रमात ते म्हणाले की, वसंतदादांचा आदर्श घेऊनच जिल्ह्यातील नेत्यांनी वाटचाल केली पाहिजे. वसंतदादांचे वारसदार म्हणून प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी दादांच्या विचाराने काम करावे. पतंगराव कदम हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आदर ठेवावा. पतंगरावांनीही मोठे बंधू म्हणून सर्वांनाच एकत्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.