शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:22 IST

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता

आटपाडी : करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठले आहे. संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी शिंदेसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत गंभीर व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ही घटना घडल्यानंतर अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी हा विषय मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. पीडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची त्यांनी मागणी केली. त्याचवेळी आमदार सुहास बाबर यांनी या घटनेत कोणाचा हस्तक्षेप असल्याचे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे कॉल डिटेल्स काढावेत, अशी मागणीही केली होती. अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणातील दोषींचा पर्दाफाश होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनच भूमिका होती व आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनावर कोणाचा दबाव होता काय? ही वस्तुस्थिती उजेडात आणण्यासाठी गृहविभागाने व पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स काढावेत.यावेळी अरविंद चव्हाण, विजय सरगर, रामदास सूर्यवंशी, विजय देवकर, दिनकर पाटील, नंदकुमार कदम, अभिजीत देशमुख, संजय यमगर, किसन कटरे, जयप्रकाश चव्हाण, मंगेश सस्ते, मनोहर नांगरे, गोरख बाबर, फत्तेसिंह देशमुख, आप्पासाहेब पाटील, संदीप मंडले, अनिरुद्ध देशमुख, मनोज देशपांडे, आबासाहेब ऐवळे, सचिन सावंत, मारुती ढोबळे, अनिल मुढे उपस्थित होते.