सांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:01 IST2021-01-29T12:59:52+5:302021-01-29T13:01:17+5:30

Crimenews Sangli police- सांगली शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या अडडा सांगली ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर हे ग्राहक म्हणून अड्ड्यावर पोलिसांना आढळून आले.

Police inspector arrested in raid on Sangli brothel | सांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेत

सांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेत

ठळक मुद्देसांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेतसांगली ग्रामीण पोलिसात सर्वांवर गुन्हा दाखल

सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या अडडा सांगली ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर हे ग्राहक म्हणून अड्ड्यावर पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादव, शिवाजी वाघले, अरूण देवकर आणि सत्यजीत पंडीत यांना अटक केली आहे. कर्नाळ येथील हॉटेल राजवीरमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता, दोन पिडीत महिलांसह सहाजण होते.

यातील एक आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवकरही होते. वेश्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलीस निरीक्षकच आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसात सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police inspector arrested in raid on Sangli brothel