शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळच

By admin | Updated: November 16, 2016 22:41 IST

जाचक अटी : जत तालुक्यातील चित्र; ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला अल्पसा प्रतिसाद

संख : शासनाच्या जाचक अटी, कमी रक्कम यामुळे कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यात अल्पसा प्रतिसाद मिळाला आहे. कृषी विभागाकडून २७६ मंजूर शेततळ्यांपैकी फक्त ३३ शेतकऱ्यांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरली आहे. फळबागांसाठी शेततळे उपयुक्त असलेल्या आरडीव्हीवाय व एनएचएम या योजना यापूर्वी बंद केल्या आहेत. मागेल त्याला शेततळे या गोंडस नावाखाली योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याचे काम शासनाने केले आहे. हेच का शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाकडून मोठा गाजावाजा करून ही योजना फेब्रुवारी महिन्यामध्ये आणण्यात आली. प्रसारमाध्यमांतून जाहिरात देऊन शेतकऱ्यांकडून शासनाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले. कागदोपत्री आॅनलाईन अर्ज भरणे यासाठी शेतकऱ्यांनी १५० रूपये खर्च केले आहेत. जत तालुक्यात या योजनेसाठी ७ हजार ६०० अर्ज आॅनलाईन आले होते. एक हजार अर्जदार शेतकऱ्यांच्या यादीमधून फक्त २७६ शेततळी मंजुरीची यादी आली आहे. त्यामुळे २७६ लाभार्थींना लाभ मिळणार होता. जाचक अटी, कमी रकमेमुळे तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांनी, मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यायला नकार दिला. त्यामुळे प्रारंभापासून याबाबत प्र्रश्नचिन्ह होते. या योजनेसाठी पात्रता ज्या शेतकऱ्याकडे, त्याच्या नावावर कमीत कमी ९.६0 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे या घटकाचा लाभ मिळालेला नसावा. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक. मागील ५ वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावामधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. प्राधान्यक्रमासाठी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता करीत सूट देऊन, प्रथमप्राधान्य दिले जाणार आहे. इतर ज्येष्ठता यादीत सूट देऊन, प्रथमप्राधान्य दिले जाणार आहे. इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्येष्ठता यादीनुसार प्रथम अर्ज सादर करण्यास प्रथमप्राधान्य, याप्रमाणे या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यात येईल, अशी नियमावली होती. मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये शेततळे जमिनीची खुदाई करून जमिनीमध्ये करायचे आहे. कठीण खडक असल्यामुळे हे काम ५० हजार रूपयामध्ये पूर्ण होणे शक्य नाही. शेततळे ३० बाय ३० बाय ३ चे करण्यासाठी दीड लाख रूपयाची गरज आहे. शेततळ्यासाठी उपयुक्त असलेली शासनाची आरकेव्हीवाय व एनएचएम ही योजना होती. ही योजना दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. या माध्यमातून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपयोगी होणार आहे. सध्या द्राक्षे, डाळिंब, बोर, लिंबू या बागांचे क्षेत्र वाढले आहे. पाऊस कमी झाल्याने पाण्याची साठवणूक करून ते फळबागांना देणे सुलभ होणार आहे. परंतु जाचक अटी, कमी रक्कम यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळाला आहे. दुष्काळातील शेतकऱ्यांना निसर्गाकडून व शासनाकडून हेळसांड सहन करावी लागत आहे. योजनेतील जाचक अटी शिथील करून दीड लाखापर्यंत रक्कम वाढावी, ही मागणी होत आहे. (वार्ताहर) हरियाणाचा : ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला शेततळे योजनेस स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट-२०१६ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील शंभर व्यक्ती, राजकीय संस्था, अशासकीय संस्थांमधून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात या योजनेस पहिल्या शंभरामध्ये येण्याचा मान मिळाला आहे. हरियाणा येथील स्कॉच कन्सल्टन्सी प्रा. लि. ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशपातळीवर स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स अ‍ॅवॉर्ड देण्यात येतो.