पाटबंधारेचे कार्यालय सांगलीत फोडले तिघांवर गुन्हा : रखवालदाराकडून पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:17 IST2018-11-24T13:17:17+5:302018-11-24T13:17:51+5:30

विश्रामबाग येथील वारणालीतील पाटबंधारे कार्यालय गुरुवारी मध्यरात्री फोडण्यात आले. टिकावने कपाट फोडण्याचाही प्रयत्न झाला. पण रखवालदाराच्या प्रसंगावधानतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.

Patna Bandh's office stays in Sangli, crime against three: Chawn from the watchdog | पाटबंधारेचे कार्यालय सांगलीत फोडले तिघांवर गुन्हा : रखवालदाराकडून पाठलाग

पाटबंधारेचे कार्यालय सांगलीत फोडले तिघांवर गुन्हा : रखवालदाराकडून पाठलाग

सांगली : विश्रामबाग येथील वारणालीतील पाटबंधारे कार्यालय गुरुवारी मध्यरात्री फोडण्यात आले. टिकावने कपाट फोडण्याचाही प्रयत्न झाला. पण रखवालदाराच्या प्रसंगावधानतेमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मध्यरात्री अडीच वाजता कार्यालयाच्या लाकडी फळ्या फोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. तेथील साहित्य विस्कटले. चोरट्यांनी टिकावने कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आवाजाने रखवालदारास जाग आली. त्याने कार्यालयाकडे धाव घेतली. तोपर्यंत तीन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. रखवालदाराने चोरट्यांचा पाठलागही केला. पण ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळी संजयनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. हे कपाट अत्यंत जुने आहे. कपाटात काहीही नव्हते. हवालदार अरुण औताडे तपास करीत आहेत.

Web Title: Patna Bandh's office stays in Sangli, crime against three: Chawn from the watchdog