मिरज : सुट्टीच्या हंगामात रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबईतून राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वेगाड्या कमी असल्याने राज्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.मुंबईहून उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांकडे एकूण ११७ गाड्या धावत आहेत. यात पाटणा (२३), गोरखपूर (१६), लखनौ (१७), कानपूर (२५) व वाराणसी (३६) या शहरांचा समावेश आहे. या तुलनेत मुंबईतून राज्यातील शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या केवळ २६ इतकीच आहे.मुंबई-कोल्हापूर (२), लातूर/धाराशिव (३), पंढरपूर (१), नांदेड (६), शिर्डी (४) आणि शेगाव (९) अशी रेल्वे गाड्यांची आकडेवारी आहे. यामुळे उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील शहरासाठी ४ ते ५ पट कमी गाड्या असल्याचे स्पष्ट होते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथील प्रवाशांची अडचण होत आहे. रेल्वे सेवा अपुरी असल्याने प्रवाशांना खासगी बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रवास खर्चात वाढ होत आहे.विशेषतः सांगली, लातूर, धाराशिव, पंढरपूर या शहरांना पुरेशी रेल्वे कनेक्टिव्हिटी नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पूर्वी मिरज व कोल्हापुरातून सुटणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, पंढरपूर-मिरज सुपरफास्ट व मिरज-हुबळी एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्याही बंद करण्यात आल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दररोज ६ ते ८ गाड्या सुरू कराया पार्श्वभूमीवर मुंबई-कोल्हापूरदरम्यान दररोज ६ ते ८ गाड्या सुरू कराव्यात, मुंबई-लातूर, धाराशिव नवीन एक्स्प्रेस सुरू करावी, मुंबई-पंढरपूर नियमित सेवा उपलब्ध करावी यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्ग उभारण्याची मागणी आहे. राज्यात रेल्वेत दुय्यम वागणूक असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
Web Summary : Limited trains from Mumbai to Maharashtra cities during peak season cause hardship. More trains serve North India. Western Maharashtra and Marathwada passengers face difficulties and rely on costly private transport due to inadequate rail connectivity.
Web Summary : पीक सीजन में मुंबई से महाराष्ट्र के शहरों के लिए सीमित ट्रेनें होने से यात्रियों को परेशानी हो रही है। उत्तर भारत के लिए अधिक ट्रेनें हैं। रेल कनेक्टिविटी की कमी के कारण पश्चिमी महाराष्ट्र और मराठवाड़ा के यात्रियों को कठिनाई हो रही है और वे महंगे निजी परिवहन पर निर्भर हैं।