Sangli: भाजपच्या पोकळ घोषणांचा पंचनामा करा; आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
By अशोक डोंबाळे | Updated: March 8, 2024 19:00 IST2024-03-08T18:59:44+5:302024-03-08T19:00:01+5:30
सांगली : भाजपने गेल्या दहा वर्षांत अनेक आश्वासने देऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपचा ...

Sangli: भाजपच्या पोकळ घोषणांचा पंचनामा करा; आमदार विक्रमसिंह सावंत यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
सांगली : भाजपने गेल्या दहा वर्षांत अनेक आश्वासने देऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी १० वर्षांत त्यांनी दिलेल्या पोकळ घोषणांचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी शुक्रवारी ग्रामीण पदाधिकाऱ्यांची निवड केली. या बैठकीत सावंत बोलत होते. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, युवा नेते जितेश कदम, सुभाष खोत, सिकंदर जमादार, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, अमित पारेकर आदी उपस्थित होते. विक्रमसिंह सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत भाजपने जनतेची फसवणूक केली आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. गॅस, पेट्रोलच्या किमती वाढल्या असून, महागाई गगनाला भिडली आहे.
काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
काँग्रेसच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष - सिकंदर जमादार (क. डिग्रज, ता. मिरज), उपाध्यक्ष - आनंदराव रासकर (कडेगाव), संदीप जाधव (येलूर, ता. वाळवा), संभाजी पाटील (बेडग, ता. मिरज), नंदकुमार शेळके (वाळवा), शिवाजी मोहिते (हरिपूर, ता. मिरज). खजिनदार - सुभाष खोत (कानडवाडी, ता. मिरज). सरचिटणीस - मिलिंद डाके (पलूस), आण्णाराव पाटील (सनमडी, ता. जत), सदाशिव खाडे (कवलापूर, ता. मिरज). सदस्य - शेखर तवटे (एरंडोली, ता. मिरज).