राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:02 AM2020-05-24T11:02:34+5:302020-05-24T11:02:58+5:30

राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

Opposition should seek help from Center rather than politics: Vishwajit Kadam | राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

राजकारणापेक्षा विरोधकांनी केंद्राकडून मदत आणावी : विश्वजित कदम

Next
ठळक मुद्देराबणाऱ्या यंत्रणेचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाºया विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून महाराष्टला भरीव मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले की, कोरोनाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. राज्य शासन शक्य तेवढ्या चांगल्या उपाययोजना करीत आहे. याऊलट गतवर्षी महापुराच्या काळात केंद्र सरकारने व तत्कालीन राज्य सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी, गोरगरिबांना किती मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. कोरोनाच्या संकटात एकीकडे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत करण्याचे सोडून विरोधक दुसºयाच गोष्टीचे राजकारण करीत आहेत.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. त्यामुळे या काळात कुणी राजकारण, प्रदर्शन, आंदोलन करू नये. विरोधकांनी मुख्यमंत्री निधीला मदत करण्याऐवजी पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करून पक्षीय राजकारण करण्यापेक्षा केंद्राकडून राज्यात जास्तीत-जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी. राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला.

कोरोनामुळे राज्यात अडकलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावी परत जाण्यासाठी याद्या तयार करून त्यांच्यासाठी केंद्राने रेल्वेची सोय करावी, अशी वारंवार मागणी करूनही उत्तर प्रदेश, कर्नाटकसारख्या राज्यांनी गेले २० दिवस टाळाटाळ केली, हे दुर्दैवी आहे, अशी टीका कदम यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रालयातच असतात
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे मंत्रालयात थांबून चांगले काम करत आहेत. तसेच सर्व मंत्रीही आपआपल्या खात्याच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात चांगले काम करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी सरकार मनापासून काम करत आहे. यापुढेही हे काम चांगल्या पद्धतीने सुरू राहील.

Web Title: Opposition should seek help from Center rather than politics: Vishwajit Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.