शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्याचा पाणी प्रश्न जयंत पाटीलच सोडवू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ...

जत : स्व. राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजारामबापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हैशाळ योजनेपासून वंचित ६५ गावांच्या विस्तारित योजनेसाठी सहा टीएमसी पाणी मंजूर केले. त्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना समृद्ध करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब, माजी नगरसेवक भय्या कुलकर्णी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, प्रकाश व्हनमाने, योगेश व्हनमाने, दयगोंडा बिराजदार, माजी सरपंच नशीर मुल्ला आदी उपस्थित होते.

जमदाडे म्हणाले, विस्तारित योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही सर्वांनी प्रांत कार्यालयासमोर पदाधिकारी व शेतकऱ्यांसोबत उपोषण केले होते. सततचा पाठपुरावा व जनमताचा आदर करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणी उपलब्धतेसाठी खूप प्रयत्न केले होते. लोकनेते कै. राजारामबापू यांनी उमदीपर्यंत केलेली पदयात्रा व त्यांचे तालुक्यावर असणारे विशेष प्रेम यामुळे त्यानी जिद्दीने सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले आहे.

बसवराज पाटील म्हणाले, स्वर्गीय बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंत पाटील यांनी जत तालुक्यात लक्ष घालण्यासाठी आम्ही सर्वांनी साकडे घातले. सहा टीएमसी पाणी मंजूर करून विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली आहे. भविष्यात अशाच प्रकारचे प्रश्न सोडविण्याची धमक जयंत पाटील यांच्यातच आहे. आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, नगर परिषद या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी ताकद उभी करावी लागणार आहे.

चौकट

जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार?

जत तालुक्यातील विस्तारित पाणी योजनेचा ज्वलंत पाणी प्रश्न होता. या संदर्भात जयंत पाटील यांच्याकडे जतच्या सर्वच नेत्यांनी पाठपुरावा केला होता. पाटील यांनी विस्तारित पाणी योजनेला सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याने दुष्काळी भागातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजप, जनस्वराज, काँग्रेस पक्षातील मातब्बर नेते पक्षप्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरण बदलणार आहेत.