टोप ते दिघंची रस्त्याचे ३० टक्केच काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:21+5:302021-04-11T04:26:21+5:30

सांगली : टोप ते दिघंची राज्यमार्गाच्या कामाची सुरुवात होऊन दोन वर्षे झाली आहेत. तरीही या रस्त्याचे काम ३० टक्केच ...

Only 30% of the road from Top to Dighan is completed | टोप ते दिघंची रस्त्याचे ३० टक्केच काम पूर्ण

टोप ते दिघंची रस्त्याचे ३० टक्केच काम पूर्ण

सांगली : टोप ते दिघंची राज्यमार्गाच्या कामाची सुरुवात होऊन दोन वर्षे झाली आहेत. तरीही या रस्त्याचे काम ३० टक्केच पूर्ण असून उर्वरित कामांसाठी ठेकेदाराने मुदतवाढ मागितली आहे. या रस्त्यासाठी साडेसातशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथून या रस्त्याची सुरुवात झाली होती. हा रस्ता आटपाडी, करगणी, खानापूर तालुक्यातील भिवघाट, करंजे, तासगाव तालुक्यातील वायफळे, तासगाव, पाचवा मैल, पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी, शिगाव, वडगाववरुन टोप येथे पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला मिळत आहे. या रस्त्याची लांबी ८८ किलोमीटर असून १६ मीटर रस्त्याची रुंदी आहे. या रस्त्यासाठी शासनाने साडेसातशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. टोप ते आष्टा आणि आटपाडी ते भिवघाटपर्यंत रस्त्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे. पण, उर्वरित कामे अपूर्णच राहिली आहेत. रस्त्याचे ३० टक्केच काम पूर्ण झाले असून ७० टक्के काम अपूर्ण आहे. ठेकेदारांना कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत होती. पण, कोरोनाचे कारण देत ठेकेदाराने काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.

चौकट

असा आहे राज्यमार्ग

दिघंची ते टोप वडगाव राज्यमार्ग क्रमांक १५१ सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, पलूस, तासगाव, वाळवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून जात आहे. हा राज्यमार्ग टोप येथे पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला मिळत आहे. या राज्यमार्गाचे काम गतीने सुरु असून सांगली ते कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक गतीने जाण्यास मदत होणार आहे.

चौकट

रस्त्यांचे प्रकार

-राष्ट्रीय महामार्ग

-राज्य महामार्ग

-द्रुतगती मार्ग

-जिल्हा मार्ग

-सीमा मार्ग

-पाणंद रस्ता

Web Title: Only 30% of the road from Top to Dighan is completed